प्रिआंती इंग्लिश स्कुल अंड ज्युनिअर कॉलेजचा दहावीचा १००% निकाल..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार सोहळा..

कामठी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु/मार्च 2023 च्या परीक्षेत प्रिआंती इंग्लिश स्कुल अंड ज्युनिअर कॉलेज तरोडी (बु) ता.कामठी जि.नागपूर या माध्यमिक शाळेचा 100% निकाल लागला आहे . परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विध्यार्थी व पालकांचा गुणगौरव व सत्कार सोहळा आज शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता .

गुणवंत विध्यार्थी सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गजानन शिक्षण सेवा संस्थेच्या अध्यक्षा प्रा.अवंतिकाताई लेकुरवाळे ( सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपूर ) , रमेश लेकुरवाळे (सचिव श्री गजानन शिक्षण सेवा संस्था नागपूर ) सतीशजी बरडे ( मा. उपाध्यक्ष शि.पा.सं.) प्राचार्या. नंदा ठाकरे उपस्थित होते. दहावीच्या परीक्षेत प्रथमश्रेणी प्रविण्याप्राप्त विध्यार्थी

1) वंश विजय बांते – 92%

(प्रथम)2) कु.आयुषी मनोहर देशमुख- 91.60% / कु तन्वी अनिल चौधरी – 91.60% (द्वितीय ) 3) तन्मय मगन बावणे – 89.80% (तृतीय) 4) सोहम ज्ञानेश्वर मिरे – 89.60% (चतुर्थ) 5) अनुप भुजंग गेडाम – 89.20% (पाचवा) क्रमांक पटकाउन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विध्यार्थ्यांचे प्रमुख पाहुन्याच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ठ निकाल देणाऱ्या विषय शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी आपल्या भाषणातून विध्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक भाषण प्राचार्या नंदा ठाकरे मडम यांनी केले. कार्यक्रमाला सर्व विध्यार्थी , पालकवर्ग , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यामिनी खंडेलवाल यांनी तर आभार प्रिया राउत यांनी मानले .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रकृती के रक्षा करना है हमारा परम कर्तव्य - ब्रह्माकुमारी प्रेमलता दीदी

Mon Jun 5 , 2023
ब्रह्मा कुमारी विद्यालय में जल जन अभियान और विश्व पर्यावरण दिवस कार्यक्रम संपन्न हुआ  कामठी :- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वर्य विश्वविद्यालय शाखा रनाला में विश्व पर्यावरण दिन बडे ही हर्षोल्लास के साथ मनाया गया | पौधे देकर अतिथियों का स्वागत किया, संकल्प बद्ध होने के लिए दीपप्रज्वलित किया| कार्यक्रम मे प्रमुख वक्ता के रूप मे मार्गदर्शन करते हुए राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रेमलता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com