केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिव्यांगांना होणार ट्रायसिकलचे वितरण

– २४ फेब्रुवारीला आयोजन : सौरऊर्जाचलित मोटराईज्ड ट्रायसिकलमुळे उदरनिर्वाहाला मिळणार चालना

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवार, दि. २४ फेब्रुवारीला नागपूर शहरातील अस्थिव्यंग दिव्यांगांना सौरऊर्जाचलित मोटराईज्ड ट्रायसिकलचे वितरण होणार आहे. वर्धा मार्गावरील एनरिको हाइट्स (हॉटेल रेडिसन ब्ल्यूच्या शेजारी) येथे सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून, समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास, पुनर्वसन आणि दिव्यांग सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी.) यांच्या वतीने नागपूर शहरात प्रथमच अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी सौर ऊर्जा चलित मोटराईज्ड ट्रायसिकल उपलब्ध होणार आहे. यासाठी विशाखापट्टणम येथील आंध्रप्रदेश मेड टेक झोन (एएमटीझेड) या संस्थेचे विशेष सहकार्य लाभत आहे. या माध्यमातून दिव्यांगांच्या उदरनिर्वहाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासही ट्रायसिकलच्या निमित्ताने बळ मिळणार आहे. सौरऊर्जेवर ५ तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होणाऱ्या या वाहनाचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत आहे. याशिवाय ४० किलोमीटरचा कमाल मायलेज देण्याची क्षमता यामध्ये आहे. अतिशय मजबूत रचना आणि संक्षिप्त स्वरुपातील मोटराईज्ड ट्रायसिकलमध्ये इलेक्ट्रिक ब्रेक कंट्रोल सिस्टीमदेखील समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वाहनाचे इलेक्ट्रिक चार्जिंगदेखील शक्य आहे. त्यादृष्टीने एक पॉवर केबल त्यासोबत दिला जाणार आहे. समायोजित (अॅ डजस्टेबल) होऊ शकणारे हँडल आणि बॅटरी पातळी निर्देशक ही ट्रायसिकलची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना व पालकांना येणाऱ्या समस्या निराकरणासाठी समुपदेशकाची व्यवस्था-मंडळाच्या विभागीय अध्यक्षा मंजुषा मिसकर यांची माहिती

Wed Feb 21 , 2024
पुणे, दि.२१: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च; माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान या विषयाची ऑनलाईन परीक्षा २० ते २३ मार्च तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा १ ते २६ मार्च  या कालावधीत आयोजित करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना व पालकांच्या समस्या निराकरणासाठी समुपदेशकाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाच्या विभागीय अध्यक्षा मंजुषा मिसकर यांनी दिली. परीक्षा कालावधीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com