केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मानले नागपूरकरांचे आभार

नागपूर :- नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्या वेळी विजयी केल्याबद्दल केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी समस्त नागपूरकर जनता आणि भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले. नागपूर महानगर भाजपच्या वतीने मानकापूर येथील इनडोअर स्टेडियम मध्ये स्नेहामिलन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी नागपूर महानगर भाजपच्या वतीने ना. गडकरी यांचा जाहीर सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी कांचन गडकरी, प्रसिध्द उद्योजक सत्यनारायण नुवाल, बैद्यनाथचे संचालक सुरेश शर्मा, भाजप शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी खासदार अजय संचेती, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार कृपाल तुमाने, आमदार रामदास आंबटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पवार, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार अशोक मानकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता, नितीन टेलगोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भाजप कार्यकर्ते व चाहत्यांनी ना. गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन केले.

नितीन मुकेश यांच्या गाण्यांची मेजवानी

स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्ध ज्येष्ठ गायक नितीन मुकेश यांच्या गाण्यांची मेजवानी नागपूरकरांना मिळाली. स्वतःच्या गाण्यांसह थोर गायक मुकेश यांचीही गाणी त्यांनी सादर केली. ना. नितीन गडकरी यांचे अभिनंदन करून त्यांनी नागपूर हे माझ्यासाठी आता दुसरे घर झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी नितीन मुकेश यांचे चिरंजीव नमन हे देखील उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उद्योगांसाठी विश्वासार्हता हे सर्वांत मोठे भांडवल - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Sun Jun 30 , 2024
– ‘पगारिया जेबीएन महाकुंभ’चे आयोजन नागपूर :- उद्योग करण्यासाठी भांडवली गुंतवणुक, अद्ययावत तंत्रज्ञान, इतर संसाधने आवश्यक आहेत. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, गुणवत्ता आणि पारदर्शकता. आज एकविसाव्या शतकात या चार गोष्टी कुठल्याही उद्योगांसाठी सर्वांत मोठे भांडवल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. आरपीटीएस मैदानावर आयोजित ‘पगारिया जेबीएन महाकुंभ’ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com