केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले खेळाडूंना प्रोत्साहन

नागपूर :- शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता.१९) विविध खेळांना भेट देउन खेळाडूंना प्रोत्साहित केले. ना.नितीन गडकरी यांनी मोतीबाग येथील दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मैदानातील फुटबॉल सामन्याला भेट दिली. त्यांनी फुटबॉलला किक मारून सामन्याचा शुभारंभ देखील केला व सामन्यापूर्वी खेळाडूंशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार डॉ. मिलींद माने, स्पर्धेचे कन्वेनर नवनीत सिंग तुली, समन्वयक अशफाक पटेल, संघटनेचे हरीश व्होरा, इकबाल काश्मीरी, क्रीडा शिक्षक रमेश मंडल, राहुल बांते आदी उपस्थित होते.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा द्वारा स्वच्छता अभियान

Sat Jan 20 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छ तीर्थ अभियानांतर्गत अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कामठी प्रभाग 15 विक्तु बाबा नगर येथील नाग मंदिरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. माजी नगरसेवक लालसिंग यादव,भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले, विक्की बोंबले, बादल कठाने तथा अशोक मिराशे, नरेश यादव, विनोद डेंगे, राहुल यादव, राजु ऊके, दिलीप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com