चंद्रपूर :- विदर्भाच्या दौऱ्यावर आलेले भारताचे वर्तमान गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे व महाराष्ट्रीयन जनाजनांच्या मनात आदराचे स्थान असलेले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्रद्धेय. यशवंतराव चव्हाण सोबत राजकीय क्षेत्रात केलेले कार्य व महाराष्ट्राला प्रगतीकडे व समृद्धीकडे अग्रेसर करण्यात ज्यांची मोलाची कामगिरी आहे. अशा महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या प्रति “पन्नास वर्षापासून शरद पवारांचे ओझे कशाला सहन करीत आहे महाराष्ट्र” या शब्दांनी अमित शाह यांनी भाष्य करताना स्वतःची उंची व त्यांनी स्वतःचे ओझे जनता कशी सहन करीत आहे याचा विचार न करता महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेतील मर्यादांना समर्थपणे ज्यांनी सांभाळले व राष्ट्रहितार्थ ज्यांची अनेक तपाची अहर्निश सेवा आहे त्याबद्दल मर्यादा सोडून बोलणे म्हणजे जणू निवडणुकीच्या वातावरणात या महाशयाचे डोकेच फिरले आहे. या शब्दात महाराष्ट्र जन अधिकार सन्मान व रक्षा संघर्ष समितीचे अध्यक्ष सरदार हरविंदरसिंह धून्नाजी यांनी आपल्या तीव्र भावना माध्यमांकडे प्रकट केल्या आहे.