‘पोटोबा’च्या नव्या स्टॉलचे लोकार्पण

नागपूर : नागपूर महानगरपालिका मुख्यालयामध्ये महिला बचत गटाद्वारे संचालित करण्यात येत असलेल्या ‘पोटोबा’चे नवे स्टॉल तयार करण्यात आले आहे. या नव्या स्टॉलचे बुधवारी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी लोकार्पण करण्यात आले.

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने यांनी फित कापून ‘पोटोबा’च्या नव्या स्टॉलचे लोकार्पण केले. याप्रसंगी स्वाती गुल्हाने, रंजना जोशी, फरहात कुरैशी, समाज विकास अधिकारी डॉ. रंजना लाडे, डॉ. भावना सोनकुसळे आदी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिका, महिला व बालकल्याण समिती आणि समाजकल्याण विभागाच्या वतीने दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिका सिव्हील लाईन कार्यालय परिसरात ‘पोटोबा’ या उपक्रमाचे २० फेब्रुवारी २०१९ रोजी उद्घाटन करण्यात आले होते. महिला सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने मनपाद्वारे समाज विकास विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या महिला बचत गटांना संचालनासाठी ‘पोटोबा’ उपलब्ध करून दिले जाते.

‘पोटोबा’चे संचालन करणा-या बचत गटांना पाणी आणि वीज मनपाद्वारे उपलब्ध करून देण्यात येते. नवीन स्टॉलमध्ये पाणी, वॉश बेसिन, विद्युत व्यवस्था आदी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com