केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दीक्षाभूमीला भेट, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे घेतले दर्शन

नागपूर. : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले.

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.

केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ.राजेंद्र गवई, प्रा. डी. जे. दाभाडे,प्रा.आगलावे, विलास गजघाटे,भंते दीपंकर आदींनी  केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. मान्यवरांना सन्मानचिन्ह ,शाल आणि ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हे पुस्तक देण्यात आले.

आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दटके, माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर आदी यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्मृती मंदिराला भेट

Sat Feb 18 , 2023
नागपूर :- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधींचे दर्शन घेऊन त्यांनी पुष्पांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. मोहन मते, आ. प्रवीण दटके त्यांच्यासोबत होते.     Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!