“हर घर तिरंगा 2.0” या अभियाना अंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध

पुणे :- “स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष” या निमित्ताने दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या दरम्यान “हर घर तिरंगा 2.0” अभियान राबविण्यात येत आहे. गतवर्षी प्रमाणे सामान्य नागरिकांना त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकविण्याची संधी यावर्षीही मिळाली आहे.

“ हर घर तिरंगा 2.0” या अभियाना अंतर्गत आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये अवघ्या 25 रुपयांमध्ये राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच आपल्या भागातील पोस्टमनच्या मार्फतही आपण आपली मागणी कळवू शकता.

तसेच शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधी, कार्पोरेट कार्यालये इत्यादी आवश्यकते नुसार मोठ्या संख्येत राष्ट्रध्वजांची मागणी करू शकतात. त्यासाठी 020 24263349 ह्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेऊन “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. अभिजीत इचके, वरिष्ठ अधीक्षक डाकघर, पूणे शहर पूर्व विभाग, पूणे यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे आपण online पद्धतीनेही राष्ट्रध्वजाची नोंदणी करून पोस्टामार्फत राष्ट्रध्वज घरपोहोच मिळवू शकता. online पद्धतीने राष्ट्रध्वज नोंदणी 12 ऑगस्ट पर्यंत https://www.epostoffice.gov.in या साईट वर उपलब्ध आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुपारीची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा महसूल गुप्तचर संचालयाने लावला छडा, पाच जणांना अटक

Thu Aug 10 , 2023
मुंबई :- महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) एका अनोख्या पद्धतीचा छडा लावला आहे ज्यामध्ये बंदरातून कंटेनर मालवाहतूक स्थानकापर्यंत (सीएफएस) कंटेनर वाहतुकीदरम्यान कागदोपत्री नोंद केलेल्या वेष्टित मालात कंटेनरमध्ये भरलेला सुपारीचा नोंद न केलेला माल बदलून सुपारीची तस्करी केली जात होती. तस्करी करणाऱ्या टोळीवर केलेल्या या मोठ्या कारवाईत, डीआरआय ने पाच जणांना अटक केली आहे आणि 50 मेट्रिक टना पेक्षा जास्त सुपारी जप्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com