सिमेंट पोल व अँल्युमिनियम तार चोरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस आठ किमी अंतरावर असलेल्या बोरी सिंगोरी व खेडी खोपडी शिवार येथील मोकळ्या जागेतुन सिमेंटचे पोल व अँल्युमिनियम चे तार असा एकुण ६६०० रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.
प्राप्त माहिती नुसार सागर वाघमारे हे कन्हान ग्रामिण विधृत वितरण केंद्र येथील सहायक अभियंता असुन मंगळवार (दि.२८) जुन ला सकाळी पहाटे ४ ते ८ वाजता दरम्यान सागर वाघमारे यांनी बोरी सिंगोरी व खेडी खोपडी शिवार येथील पाहणी केली असता बोरी सिंगोरी येथील मोकळ्या जागेतुन ९ सिमेंट पोल किंमत अंदाजे १८०० रूपये व २४६० मिटर अँल्युमि नियम तार किंमत अंदाजे ३००० रूपये असा एकुण ४८०० रूपये व खेडी खोपडी शिवारातुन मोकळ्या जागेतील ९८० मीटर अँल्युमिनियम तार किंमत अंदा जे १००० रूपये, ४ सिमेंटचे पोल ८०० रूपये असा एकुण ६६०० रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी सागर वाघमारे यांच्या तोंडी तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आरोपीचा शोध घेत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com