संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या उनगाव येथे एकसिस स्टील प्रायव्हेट कंपनीवरून काका पुतण्यात झालेला वाद पोलिस ठाण्यात पोहोचला असून यासंदर्भात फिर्यादी (पुतण्या)दिंगत सोनी वय 37 वर्षे रा नागपूरने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी(काका ) राजेश सोनी वय 49 वर्षे रा नागपूर विरुद्ध भादवी कलम २९४,५०६ ब अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना काल सायंकाळी साडे पाच दरम्यान उनगाव येथील एकसिस स्टील प्रायव्हेट फेक्ट्रीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नमूद घटना तारीख वेळी ठिकाणी फिर्यादीचे काका राजेश रामलाल सोनी वय 49 वर्ष राहणार प्लॉट नंबर 288 वर्धमान नगर पावर हाऊस जवळ पोलीस स्टेशन लकडगंज नागपूर हे फिर्यादीच्या ॲक्सिस स्टील प्रायव्हेट फॅक्टरी उनगाव पोलीस ठाणे नवीन कामठी नागपूर येथे आले आणि तेथील गार्ड विजय नारायण तिवारी वय 48 वर्ष याला शिवीगाळ करून फॅक्टरी च्या आत गेले याबाबत गार्डने फिर्यादी यांना फोन द्वारे माहिती दिली फिर्यादी आपल्या पत्नीसह फॅक्टरी मध्ये पोहोचले व आरोपीला ही फॅक्टरी कागदपत्रासह माझ्या नावावर आहे तुझ्याकडे काय आहे असे म्हणताच आरोपीने फिर्यादी यांना व त्यांच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ करून दोनो यहा से निकल जाओ नही तो दोनो को जान से मार डालुंगा अशी धमकी दिली. फिर्यादीचे तक्रारीवरून आरोपी विरुद्ध भादवी कलम 294 506 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.