उदित नारायण, कुमार शानू , रणवीर शोरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

मुंबई :-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते (दि. १२) विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय योगदान पुरस्कार २०२३’ राजभवन येथे प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन धम्मदान ट्रस्ट व ‘परफेक्ट वूमन’ मासिकातर्फे करण्यात आले होते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ पार्श्वगायक उदित नारायण व कुमार शानू , अभिनेते रणवीर शोरे, पर्यावरण परिषदेचे विजयराजे धमाल, दिपशिखा देशमुख, रीना त्रिवेदी, डॉ ख़ुशी गुरुभाई, कैलास मासूम, सीताराम गायकवाड, मोहम्मद सईद शेख व राखी राजाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे निमंत्रक गुरुभाई सुरेशभाई ठक्कर, वास्तू तज्ज्ञ बसंत रसिवासिया, डॉ गीत ठक्कर व चंद्रमणी जाधव यावेळी उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिलांमध्ये नव जयहिंद आणि विदर्भ तर पुरूषांमध्ये काटोल संघांची अंतिम फेरीत धडक

Fri Jan 13 , 2023
खासदार क्रीडा महोत्सव 2023 खो-खो (विदर्भस्तरीय) गुरूवार, 12 जानेवारी 2023 विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर नागपूर :-  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेमध्ये महिला गटात नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ आणि विदर्भ क्रीडा मंडळ काटोल संघाने अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर पुरूष गटात विदर्भ युथ क्रीडा मंडळ आणि विदर्भ क्रीडा मंडळ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com