रूसा सहभागी विद्यापीठे व महाविद्यालयांसमवेत आढावा बैठक रूसा अंतर्गत 26.51 कोटी अनुदानाचे वाटप

            मुंबई : राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान अंतर्गत रूसा सहभागी विद्यापीठे व महाविद्यालयांच्या समवेत आढावा बैठकीत रूसा अंतर्गत 26.51 कोटी अनुदानाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

            या बैठकीत रूसा अंतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. रूसा अंतर्गत अपुर्ण कामे विहित कालावधीत पूर्ण करून कामाची गुणवत्ता राखणे तसेच पारदर्शकता ठेवण्याबाबत विद्यापीठ व महाविद्यालयांना आवाहन करण्यात आले.

            नवीन शैक्षणिक धोरण, महाविद्यालयीन स्वायत्ता या विषयाच्या अनुषंगाने उपस्थित प्राचार्य व प्रतिनिधीना मार्गदर्शन करण्यात आले. रूसा अंतर्गत प्राप्त शैक्षणिक उपकरणांचा इतर महाविद्यालये व विद्यार्थी यांना देखील लाभ उपलब्ध करून देण्याबाबत सूचना यावेळी करण्यात आल्या. रूसा 3.0 अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कामे हाती घ्यावी. तसेच सर्व महाविद्यालय व विद्यापीठ यांनी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेसोबत सहभागी होवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

सीईटीमार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

Wed Dec 8 , 2021
मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये  केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या प्रथम फेरी उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार जागा वाटप करण्यात आलेली असून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत EWS, NCL आणि CVC/TVC आत मूळ प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याची,  माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.             याबाबत विद्यार्थी व पालक यांची मागणी, कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक असलेल्या संबंधीत विविध प्रमाणपत्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!