मनपा क्रीडा व सांस्कृतीक महोत्सव उत्साहात संपन्न ,उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या संकल्पनेतुन कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण कमी व्हावा तसेच त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळावा या दृष्टीने मनपा अधिकारी, कर्मचारी, शिक्षकगण यांच्यासाठी क्रीडा व सांस्कृतीक महोत्सव आयोजन करण्यात आले होते. ४ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान आयोजीत या क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.    कोहिनुर मैदान, चांदा क्लब ग्राउंड येथे मनपा अधिकारी, कर्मचारी,शिक्षक यांच्यात झालेल्या क्रिकेट स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले होते. यातील टीम सीएमसी, सुपर इलेव्हन, संगणक विभाग,अग्निशमन विभाग हे ४ संघ सेमीफायनल मध्ये पोहचुन अंतिम सामन्यात संगणक विभाग उपविजेता तर टीम सीएमसी विजय ठरली.

तर ८ फेब्रुवारी रोजी वन अकादमी येथील सभागृहात झालेल्या सांस्कृतीक कार्यक्रमात मनपाच्या सर्व शाळांच्या सर्व शिक्षकांनी, कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी सहभाग दर्शविला. सांस्कृतीक कार्यक्रमात संगीत, गायन, एकल नृत्य, समुह नृत्य,मिमिक्री,Instrumental performance, कविता,शायरी,गझल ,लोकनृत्य, नाटक,stand up comedy इत्यादी विविध कला गुण प्रदर्शित करण्याची संधी मनपा कर्मचाऱ्यांना मिळाली. यात प्रो इंजिनिअर्स ग्रुपद्वारे करण्यात आलेले समुह नृत्य मुख्य आकर्षण ठरले.लाईव्ह ऑर्केस्ट्राद्वारे कार्यक्रमात रंगत आली.

मनपा शिक्षण विभागाचे शालेय क्रीडासत्र ३ फेब्रुवारी रोजी पार पडले होते. यात विविध मैदानी स्पर्धा व सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले होते,सावित्रीबाई फुले शाळेने सर्वाधिक पुरस्कार यात प्राप्त केले.विजयी शाळा व वैयक्तीक विजेत्या विद्यार्थ्यांना आयुक्त विपीन पालीवाल यांचा हस्ते गौरवान्वित करण्यात आले.

तसेच अधिकारी कर्मचारी क्रिकेट सामन्यातील राजेंद्र मोहुर्ले बेस्ट किपर, बहादूर हजारे बेस्ट फिल्डर तर सहायक आयुक्त राहुल पंचबुद्धे यांना प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

क्रीडा व सांस्कृतीक महोत्सव यशस्वी करण्यास उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त विद्या पाटील,मुख्यलेखाधिकारी मनोहर बागडे, शहर अभियंता महेश बारई,उपअभियंता अनिल घुमडे, विजय बोरीकर, रवींद्र हजारे व सर्व विभाग प्रमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजभवन येथे आंतरराष्ट्रीय अपस्मार दिनानिमित्त कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन

Tue Feb 14 , 2023
अपस्मार व्यवस्थापनासाठी योग तसेच फिजिओथेरपीची देखील मदत घ्यावी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अपस्मार व्यवस्थापन कार्यासाठी राज्यपालांकडून डॉ निर्मल सुर्या यांचा सत्कार मुंबई :- अपस्मार किंवा आकडी येणे ही गंभीर समस्या असून योग्य औषधोपचाराने त्यावर मात करता येते. अपस्मार व्यवस्थापनासाठी रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांनाकडून वेळीच उपचार करून घ्यावे तसेच त्यासाठी योग व फिजिओथेरपीची देखील मदत घ्यावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com