कार-दुचाकी ची धडक दोघे जखमी

– चोरबाहुली जवळील उड्डानपुलावरील घटना

रामटेक :-  नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील चोरबाहुली-पवनी मध्यमार्गात असलेल्या उडानपुलावर एका धावत्या कारला मागेहुन दुचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकी चालकासहित मागे बसलेले व्यक्ती जखमी झाले.

प्राप्त माहितीनुसार गुरुवार दिनांक 8 डिसेंम्बर ला (सकाळी 9.30) वाजताच्या सुमारास ही दोन्ही वाहने पवनी कडून मनसरकडे येत होते. चोरबाहुली शिवारात एकाच मार्गाने येणाऱ्या दुचाकी चालक बालक ईश्वर भागडकर रा.घोटी (दाहोदा) हा आपल्या MH 40 CB 4365 क्रमांकाच्या दुचाकीने पवनीकडून मनसरकडे येत होता. दरम्यान त्याच मार्गाने दुचाकीच्या समोर कार क्र. MP 49 C 5358 ही देखील मनसर कडे जात असतांना अचानक मागेहुन येणाऱ्या दुचाकीने अनियंत्रित होऊन मागेहून धडक दिली.यात दुचाकी रस्त्यावर कोसळून दोन्ही व्यक्ती पडले यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती खुमारी टोल प्लाझा यांना देण्यात आली. तात्काळ टोल प्लाझा चे कर्मचारी डॉ.हनवत, गणेश बघमारे व कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे नेण्यात आले. सद्या जखमींवर उपचार सुरू असून कोणतीही मोठी हानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार सोहळा ११ डिसेंबरला

Fri Dec 9 , 2022
पत्रकार सुमेध वाघमारे, डॉ. धर्मपाल बौध्द, डॉ. अनिल सुर्या, ज्ञानेश्वर रक्षक, माया राठोड, डॉ. वैभव अग्रवाल आणि प्यारे खान यांचा होणार गौरव नागपूर :- मागील २२ वर्षापासून मानव अधिकार क्षेत्रात कार्यरत राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या वतीने १० डिसेंबरला साजरा होणा-या राष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त ११ डिसेंबर रोजी देशातील विविध भागात मानवाधिकार क्षेत्रात दखलपात्र कामगिरी करणा-या मान्यवरांना राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार प्रदान करण्यात येणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com