साई स्पोर्टिंग क्लब महिला कबड्डी संघ उपविजेता
काटोल –  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेसंकल्पनेतून गेल्या 4 वर्षांपासून सलग सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सव 2022 मध्ये ज्युनियर आणि सब ज्युनियर महिला कबड्डी स्पर्धेत साई स्पोर्टिंग क्लब काटोलच्या महिला कबड्डी संघांनी उपविजेता ठरली आहे
  मुलींचे संघात सोनल राठोड, तनुश्री ठाकरे, नम्रता गाढवे, वैष्णवी सुरजूसे, दीपाली उईके, तनु युवनाते, खुशी सावरकर माधुरी मोरे, पायल राऊत, प्रांजली भस्मे, आचल खंते,  खुशी वावरकर, शीतल वोरोलिया,सोनम पोटपिटे, या महिला  खेळाडू सहभागी झाल्या होत्या,या नगरपरिषद हायस्कूलच्या विध्यार्थीनी असून क्रीडाशिक्षक सचिन वाळके आणि प्रशिक्षक विलास धवड यांचे मार्गदर्शनात कबड्डीचे धडे घेत आहे
  यशस्वी खेळाडूंचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर,पर्यवेक्षक डॉ प्रकाश कुंभरे, साईचे अध्यक्ष शत्रुघ्न राऊत,अंशु ठाकुर,वैभव विरखरे,भूषण भोयर,दिलीप जिचकार,महेंद्र खंडाईत,सुमित बबुटा,दीपक बगळे,बबलू चौधरी आदींनी अभिनंदन केले आहे
Email Us for News or Artical - [email protected]
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!