नागपूर :- नागपूर शहरातील विविध भागात बुधवारी (ता. 7) आलेल्या वादळी पावसामुळे सी.ए. रोड परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. सतनामी नगर, भाउराव नगर, व्हीएमए कॉलेज, वर्धमान नगर, पूर्व वर्धमान नगर, हिरवी नगर, गरोबा मैदान आदी विविध ठिकाणी या पावसामुळे झाडांची पडझड झाल्याने रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली तसेच अनेक वाहनांचे देखील नुकसान झाले.
अचानक उद्भवलेल्या या आपात्कालीन स्थितीत मनपाच्या अग्निशमन, उद्यान, विद्युत व अन्य विभागाच्या चमूद्वारे तात्काळ मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पडलेले झाड, फांद्या बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. अन्य ठिकाणचे कार्य मनपाच्या पथकाद्वारे युद्धपातळीवर सुरू आहे. समस्यांसंदर्भात संपर्क करा…
आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, मनपा
-0712-2567029
-0712-2567777
अग्निशमन केंद्र:-
-0712-2540299
-0712-2540188
-101
-108
-7030972200