संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर महामार्गावरील कन्हान नदी पुलावर मध्यप्रदेश रिवा कडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स चालकाने कामठी कडे येणाऱ्या तीन चाकी ऑटो ला दिलेल्या जबर धडकेत घडलेल्या अपघातात ऑटो चालकासह ऑटो मध्ये बसलेले आठ सैन्य जवान प्रवासी गंभीर जख्मि झाले असून तीन वेगवेगळ्या इस्पितळात उपचारार्थ दाखल असून मृत्यूशी झुंज देत आहेत.ही घटना आज सायंकाळीं 5 दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आठही गंभीर जख्मि सैनिक हे कामठी येथील जी आर सी मध्ये कर्तव्यदक्ष भूमिका बजावत असून आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बाहेरगावी फिरून दोन तीन चाकी ऑटो ने कामठी कडे परत येत असता कन्हान नदी पूलावर अनियंत्रित ट्रॅव्हल्स क्र एम एच 31 एफ सी 4158 च्या चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या तीन चाकी ऑटो क्र एम एच 49 ए आर 7433 ला दिलेल्या जोरदार धडकेत घडलेल्या भीषण अपघातात ऑटो मध्ये बसलेले आठ ही सैन्य जवान प्रवासी गंभीर जख्मि झाले.
घटना घडताच पोलीस नागरिकांनी मदतीची धाव घेत जख्मि ऑटो चालकासह आठही जख्मि सैन्य जवानांना उपचारार्थ हलविण्यात आले.
या गंभीर आठही जख्मि सैनिकांत कुमार पी,शेखरजाधव,मलोरजम,अरविंद,विग्नेश,नागारत्नम,धीरज रॉय,बी प्रधान चा समावेश आहे तसेच ऑटोचालक शंकर खरजबान रा गोराबाजारचा ही समावेश आहे.पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.