नागपूर :- दिनांक २८/०५/२०२४ चे ०९/३० वा. ते १२/०० वा. येणाऱ्या पावसाळयात अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसान व हानी टाळण्यासाठी आज रोजी पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत मौजा उमरी गावात उमरी डॅम शिवतीर्थ वॉटर पार्क अँड टुरिज्ञाम येथे शोध व बचाव पथक SD.R.F. टीम मार्फत प्रशिक्षण देण्यात आले.
सदर प्रशिक्षण मध्ये उपस्थित मां. DYSP सोनटक्के. PI ०१, PSI ०१, १० कर्मचारी S.D.R.F टीम असून तसेच तहसीलदार तसेच नायब तहसीलदार सावनेर तसेच तहसील कार्यालयाचे एकूण २५ कर्मचारी तसेच PHC सावनेर येथे ०५ कर्मचारी तसेच पोलीस स्टेशन केळवदचे ठाणेदार राकेश साखरकर, पोस्टे केळवद येथील १० अंमलदार तसेच पोस्टे खापा येथील ठाणेदार दहिभाते व १७ अंमलदार तसेच पोस्टे सावनेर येथील चार अंमलदार तसेच पोलीस स्टेशन खापरखेडा येथील ०३ अंमलदार असून पोलीस स्टेशन केळवद येथील पोलीस पाटील व स्थानिक गावातील पोहणारे हे उपस्थित असून सदर S.D.R.F टीम यांनी प्रशिक्षण मध्ये नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे होणारा नुकसान व हानी टाळण्यासाठी उपाययोजना बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.