होळीच्या दिवशी पोलिसांचा तगडा बंदोबस्त..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 26:-होळी व धुळीवंदन सणाच्या औचित्यावर कामठी तालुक्यात अनुचित घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात राहून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यावर वक्रदृष्टी ठेवण्यात आली.

..होळी व विशेषता धुळीवंदन च्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी रुटमार्च सुदधा काढला होता.मद्यप्राशन करून दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने बेदरकारपणे चालवितात तसेच रोडने रॅश ड्रायव्हिंग,स्टंटबाजी सारख्या कृत्य करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी, पेट्रोलिंग व पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.दरम्यान होळी पर्व मोठ्या उत्साहात इको फ्रेंडली वातावरणात पार पडला.

यासाठी डीसीपी निकेतन कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, , वाहतूक पोलीस निरीक्षक ,जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यासह कर्तव्यावर असलेल्या समस्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोलाची कर्तव्यदक्ष भूमिका साकारली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

Tue Mar 26 , 2024
मुंबई :- राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात या निवडणुकीचे मतदान दि. १९ एप्रिल, दि. २६ एप्रिल, दि. ७ मे, दि. १३ मे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights