– उ. कृषी अधिकारी व ता. कृषी अधिकाऱ्यांनी स्वतः करून दाखविले प्रात्यक्षिक
रामटेक :- अस्मानी संकट, नैसर्गिक आपत्ती, नापीकी तसेच ओला तथा सुका दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे तुटलेले आहे तेव्हा यातुन शेतकऱ्यांना सावरण्यासाठी स्थानिक कृषी विभाग नवनविन तंत्रज्ञानाची माहीती त्यांना देत आहे. नुकतेच तालुक्यातील बोरडा ( सराखा ) गावातील डडमल यांचे शेतात उपविभागीय कृषी अधिकारी योगीता मुंडे व तालुका कृषी अधिकारी दिनेश भोये यांनी चिखलणीमध्ये स्वतः उतरून प्रात्यक्षिक करून दाखवित शेतकर्याला माहिती दिली.
तालुक्यातील बोरडा ( सराखा ) येथे अशोक डडमल यांच्या शेतात एन.एफ.एस.एम. यांत्रिकीकरण भात लागवड प्रात्यक्षिक अंतर्गत यंत्राच्या साह्याने भात लागवड करण्यात आली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी रामटेक योगिता मुंडे व तालुका कृषी अधिकारी रामटेक दिनेश भोये यांनी शेतातील चिखलणीमध्ये स्वतः यंत्राच्या साह्याने भात लागवड करून यांत्रिकीकरण भात लागवडी चे फायदे व महत्व पटवुन दिले. तसेच इतर उपस्थित यांत्रिकीकरण पद्धतीने धान फायदे याबाबतचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी सरपंच जगदिश अडमाची, उपसरपंच , गावातील शेतकरी , पोलीस पाटील व गावातील प्रगतशील शेतकरी , कृषी सहाय्यक संतोष हराळ , नारायण तोडमल उपस्थित होते.