– ३० नोव्हेंबर पर्यंत रस्त्यावर ,एका बाजूने वाहतूक
नागपूर :- नागपूर महानगरपालिकाद्वारे रिंग रोड, गजानन नगर ते आझाद चौक चुनाभट्टी पर्यंत सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित केले आहे. या कामाकरिता सदर रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
रिंग रोड गजानन नगर ते आझाद चौक चुनाभट्टी रस्त्यावरील डावी बाजू वाहतुकीस बंद केल्यानंतर वाहतूक उजव्या बाजूस वळविण्यात येणार आहे. डाव्या बाजूचे काम पूर्ण झाल्यानंतर उजवी बाजू वाहतुकीस बंद करून वाहतूक डाव्या बाजूने वळविण्यात येईल. सदर आदेश ३० नोव्हेंबर पर्यंत अंमलात राहणार असल्याचे मनपा आयुक्तांनी नमूद केले आहे.