– मनपा आयुक्तांचे आदेश
नागपूर :- नागपूर महानगरपालिकाद्वारे मेहाडीया चौक ते काँग्रेस नगर आनंद मंगल कार्यालयापर्यंत सिमेंट कॉकिट रस्त्याच्या बांधकामाकरिता या रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
मेहाडीया चौक ते काँग्रेस नगर आनंद मंगल कार्यालयापर्यंत रस्ता कोणत्याही वाहतुकीस बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. सदर मार्गावरील डावी बाजु वाहतुकीस बंद केल्यानंतर रस्त्यावरील वाहतुक रस्त्याच्या उजव्या बाजुस वळविण्यात येत आहे तसेच डाव्या बाजुस काम पुर्ण झाल्यानंतर उजव्या बाजू वाहतुकिस बंद करण्यात येईल व रस्त्यावरील वाहतुक रस्त्याच्या डाव्या बाजुस वळविण्यात येईल. सदर आदेश दि. ०७ फेब्रुवारी २०२४ पासुन दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत अमलात राहील. या रस्त्यांवरील कामाचे कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंता यांनी खालील बाबीची सुरक्षीततेच्या दृष्टीने दक्षता घ्यावी.
कामाच्या ठिकाणी सुचना फलक व काम सुरू केल्याचा / काम पूर्ण करण्याचा दिनांक असलेला बोर्ड लावण्यात यावे. पर्यायी मार्ग सुरू होतो त्याठिकाणी दोन्ही टोकावर तसेच बॅरीकेटस जवळ रोडवर आपले वाहतुक सुरक्षा रक्षक/ स्वयंसेवक नेमावे. वाहतुक सुरक्षा रक्षक, वाहतुक चिन्हांच्या पाटया, कोनस्, बॅरीकेट, दारी रिफ्लेक्टिव्ह जॅकेटस्, एल.ई.डी. बॅटन, ब्लिंकर्स, इत्यादी संसाधने उपलब्ध करावे.
पर्यायी मार्ग सुरू होतो त्याठीकाणी व काम करणार आहे त्या मार्गाचे बाजुला लोकांना दिसेल अशा ठिकाणी पर्यायी मार्गाबाबत (वळण मार्ग) सविस्तर माहिती असणारे फलक लावण्यात यावेत.
रात्रीचे वेळी वाहन चालकांना माहितीकरीता एलईडी डायव्हर्शन बोर्ड लावणे आवश्यक आहे. बॅरीकेटींगवर एलईडी माळा लावणे आवश्यक आहे.
उजव्या बाजुने दुतर्फा वाहतुक चालणार आहे त्या ठिकाणी अस्थाई रस्ता दुभाजक तयार करून एकाच मार्गावरून दुतर्फा वाहतुक वळविण्यात यावी. अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार स्वतः जबाबदार राहतील. वाहतूक नियमांचे तसेच वाहतूक पोलिसांनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करावे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरीकांचे सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य उपलब्ध करुन घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.