नागपूर :- 19 मार्च रोजी होणाऱ्या नागपूर विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट आधीसभेच्या निवडणुकीत सिनेट परिवर्तन पॅनल ने आज विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आठ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तांत्रिक कारणामुळे दोन उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाही.
आठ उमेदवारी अर्जदारात माजी सिनेट सदस्य प्रा. प्रशांत डेकाटे व शीलवंत मेश्राम यांच्या सहित खुल्या प्रवर्गातून आशिष फुललेले, मुकेश मेश्राम, प्रशांत गणवीर यांनी तर ओबीसी प्रवर्गातून स्नेहल ताजने, अनुसुचित जाती प्रवर्गातून अंकित राऊत व व्हिजेएनटी प्रवर्गातून डॉ. दशरथ जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे.
यावेळी त्यांचे सोबत डॉ. प्रवीण अबगड, उत्तम शेवडे, रोहित भगत, अमित सिंग, अमोल थूल, आशिष तितरे, निलेश भिवगडे, अंकित थुल, प्रवीण झाडे, अनुपाल लांडगे, ओमराज मेश्राम, कविता मेश्राम आदि प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
अर्ज भरण्यापूर्वी उमेदवार व परिवर्तन पॅनल च्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वारावर असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले
यावेळी सिनेट परिवर्तन पॅनल संपूर्ण शक्तींशी निवडणुकीत उतरली असून दहाचे पॅनल जिंकण्याची योजना बनविण्यात आलेली आहे.