– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 1 -कामठी नगर परिषद निवडणूक आयोगाचा प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम प्रसिद्ध झाला असून आज 2 मार्च पासून निवडणूक विभागाकडून प्रारूप प्रभाग रचनेची प्रसिद्धी,हरकती व सूचना मागविणे,सूनावणीचा कार्यक्रम सुरू होत आहे तर ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे शहरात एक नवीन प्रभाग वाढणार आहे यानुसार द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीत एकूण 17 प्रभागात 34 उमेदवार निवडून येणार आहेत.
निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करताना सन 2011 च्या जनगणनेनुसार कामठी नगर परिषद क्षेत्राची प्रगणक गटनिहाय लोकसंख्या, अनुसूचित जातो व जमातीची लोकसंख्या या बाबी विचारात घेण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकारी यांच्याकडे 22 मार्च पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी होईल. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन निवडणूक आयुक्त एक एप्रिल पर्यंत अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देणार आहेत.10 मार्च ला प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात येणार असून पाच एप्रिल ला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे त्यामुळे मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर विद्यमान नगरसेवक व नगर परिषद निवडणूक लढणारे नवीन उमेदवार यांच्या नजरा प्रभाग रचना कशा पद्धतीने होईक5 ,शहरातील कुठल्या भागात नवीन प्रभाग वाढणार, जुने प्रभाग जशेच्या तसे राहणार का, त्यातही काही फेरबदल होणार का याचीही धाकधूक वाढली आहे.
प्रभाग रचना व आरक्षण सोडत पूर्ण झाल्यानंतर दावेदारी करावी अशी भूमिका अनेक इच्छुक उमेदवारांनी घेतली आहे त्यामुळे अद्याप काही इच्छुकांनी छुप्या पद्धतीने प्रचार ही सुरू करून घेतला आहे तरीही आरक्षण व प्रभाग रचनेची धाकधूक मनात असल्याचे अनेक इच्छुक उमेदवाराकडून खाजगीत बोलल्या जात आहे.
आज 2 मार्च पासून सुरू होणार प्रारूप प्रभाग रचना,हरकती , सूचना व सूनावणीचा कार्यक्रम
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com