औरंगाबादकरांना इम्प्रेस करण्यासाठी भागवत कराडांचे हे उद्योग ; मराठवाड्यातील प्रकल्प नाकारल्याच्या आरोपावरून जयंत पाटील यांनी सुनावले…

मी कोणत्याही प्रकल्पाला नकार दिलेला नाही, भागवत कराड खोटं बोलणं बंद करा…

मी प्रकल्प नाकारला असेन तर एकतरी कागद दाखवा…

मुंबई :- मराठवाड्यातील कोणत्याही प्रकल्पाला मी नकार दिलेला नाही. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी खोटे बोलणे बंद करावे.औरंगाबादकरांना इम्प्रेस करण्यासाठी भागवत कराडांचा उद्योग सुरू असल्याचे जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले.

मराठवाड्यातील प्रकल्प मंजूर करण्यास जयंत पाटील यांनी नकार दिला असे वक्तव्य भागवत कराड यांनी केले होते त्यावर जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल करत त्यांच्या आरोपाची पोलखोल केली.

फ्लोटींग सॉलर पॅनल प्रॉजेक्टबाबत भागवत कराड यांनी फक्त पत्र लिहिले होते. त्यामुळे सरकार फक्त पत्रावर चालत नाही असेही जयंत पाटील म्हणाले. खरंतर केंद्राच्या एनटीपीसीकडून प्रस्ताव यायला हवा होता मात्र भागवत कराड यांनी राज्यसरकारकडे पत्र दिले. तरी केंद्रीय मंत्री असल्याने आम्ही त्यांच्या पत्राची दखल घेतली व एक समिती गठीत केली. एप्रिलच्या शेवटी पत्र आले आणि जूनच्या सुरुवातीला आम्ही याबाबत समिती गठीत केली. त्यामुळे प्रकल्प घालवला हे सांगणे चुकीचे आहे मी नकार दिला आहे असे म्हणत असतील तर एकतरी कागद दाखवा असेही जयंत पाटील यांनी जाहीर आव्हान दिले.

भागवत कराड यांना राज्यसभा नाही तर औरंगाबादमध्ये लोकसभेला भाजपने उभे राहायला सांगितले आहे त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. निवडणूक लढवायची असेल तर लढवावी पण खोटं बोलू नये. माझ्यादृष्टीने त्यांना मी जास्त महत्त्व देत नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

आम्ही नाचत नाही आम्ही जे काही करायचं असते ते ‘करेक्ट’ करतो. त्यांना आता काही जमत नसेल म्हणून लोकांना प्रभावित करण्यासाठी ते अशी विधाने करत असतील तर त्यांनी जयंत पाटील यांनी नकार कधी दिला, निगेटिव्ह पत्र आमच्याकडून कधी गेले, त्यांना कुणी नाही म्हटलं याबाबत माहिती द्यावी. प्रकल्प कुणीच थांबवला नाही. त्यांनी फार मोठा तीर मारला असेही नाहीय. त्यांनी प्रकल्प आणला नाहीय. त्यांनी कल्पना रंगवली पाण्यावर सोलर पॅनल बसवू यावर खात्यात याअगोदरच चर्चा सुरू होती त्यामुळे नवीन रॉकेट सायन्स नाहीय असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाचे निर्देश

Thu Nov 3 , 2022
आयुक्तांनी केली भांडेवाडीतील डॉग शेल्टरची केली पाहणी नागपूर :- शहरातील भटक्या/ मोकाट श्वानांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांचे निर्बीजीकरण करण्यात यावे, तसेच भांडेवाडी येथे निर्बीजीकरणासाठी शस्त्रक्रिया केंद्र उभारण्यात यावे, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने भटक्या/मोकाट श्वानांसाठी भांडेवाडी येथे डॉग शेल्टर उभारण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com