अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक

कन्हान :- अंतर्गत १० किमी अंतरावर जुनी कामठी येथील महादेवाचे मंदीरासमोरील दिनांक २१/०९/२०२३ चे १३.०५ वा. दरम्यान पोलीस स्टेशन कन्हान येथील स्टाफ यांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, नमुद घटनास्थळी अरविंद बखाराम नागोसे रा. आरीफ अंसारी यांचे शेतात रा. जुनी कामठी या नावाचा इसम हा जुनी कामठी येथील महादेवाचे मंदीरासमोर सार्वजनीक जागेत आपले हातात लोखंडी कोयता घेवून धुमधाम करून जोराजोरात शिवीगाळ करीत आहे. पोलीस स्टेशन कन्हान येथील स्टाफ तेथे पोहचल्यावर तेथे तो इसम धूमधाम करीत असल्याचे दिसून आल्याने त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव अरविंद बखाराम नागोसे वय ४७ वर्ष रा. पारडशिंगा ह. मु. आरीफ अंसारी रा. कामठी यांचे शेतात असे सांगीतले इसमाजवळ लोखडी पाते असलेला कोयता विनापरवाना अवैध्यरित्या मिळून आल्याने जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणी सरकार तर्फे फिर्यादी नामे सफी सुर्यभान जळते व नं १३५ पोलीस स्टेशन कन्हान यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे कन्हान येथे आरोपीविरुध्द कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.. नमुद्र आरोपीस अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार सुर्यभान जळते, पोलीस स्टेशन कन्हान हे करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पळवून नेणाऱ्या आरोपीविरुध्द गुन्हा दाखल

Sat Sep 23 , 2023
खापा :- दिनांक २१/०९/२०२३ चे १०.३० वा. सुमारास पो.स्टे. खापा हद्दीत फिर्यादी यांनी पोस्टेला येवून तोडी रिपोर्ट दिली की, त्यांची अल्पवयीन मुलगी वय १५ वर्ष ही दिनांक २१/०९/२०२३ रोजीचे सकाळी १०/३० वा. शाळेत जाते म्हणून गेली परंतु शाळेत न जाता तिला कोणत्यातरी अज्ञात इसमाने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला फुसलावुन पळवून नेले. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. खापा येथे अज्ञात आरोपीविरुध्द […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com