काचेवानी येथील कराडे रेस्टॉरंटवर तिरोडा पोलिसांची धाड

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  

एकूण ३४३०५ /-  रुपयांचा अवैध दारू सह मुद्दमाल जप्त..

गोंदिया – तिरोडा पोलिस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काचेवानी येथील कराडे रेस्टॉरंटमधील अवैध दारू विक्री केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली.

त्यानुसार पोलिसांनी धाड टाकली असता अंग्रेजी दारू सह मोहाची दारू व मोबाईल फोन सह रोख रक्कम 4420 रुपये असे एकूण ३४३०५/-  रुपयांचा माल रेस्टॉरंट मालक निलेश सुभाष कराडे,काचेवानी वय 35 वर्षे कडुन पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर कारवाई  प्रमोद मडामे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश पारधी पोलिस निरीक्षक तिरोडा, सह पोलीस शिपाई व हवालदार यांनी केली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com