संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील वरंभा-झरप गावात वाघाची दहशत पसरली असून काल मध्यरात्री एका वाघाने गावातील श्रावण मोहूर्ले नामक शेतकऱ्यांचे बांधून असलेल्या तीन गाईवर हल्ला चढवून जीवानिशी भक्षण केल्याची घटना आज सकाळी निदर्शनास येताच सर्वत्र हळहळ व्यक्त करीत गावात भीतीमय वातावरण पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या मार्गदर्शनार्थ त्वरित कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत शहाणे, गावातील चंद्रशेखर साळवे यांनी त्वरित घटनास्थळ गाठून नुकसानग्रस्त श्रावण मोहूर्ले यांची मनधरणी करीत संबंधित वनविभाग अधिकाऱ्यांना बोलावून घेतले व घटनास्थळाचा पंचनामा करीत तहसीलदार यांना नुकसानग्रस्त श्रावण मोहूर्ले यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
दरम्यान घटनास्थळ सह आदी ठिकाणी पाहणी केली असता वाघाच्या पायाच्या पंजाचे ठसे उमटलेले दिसून आले.तेव्हा गावात या घटनेची पुनरावृत्ती न व्हावी यासाठी सर्वांना सावधगिरीचा ईशारा देण्यात आला.याप्रसंगी आडका ग्रा प सरपंच विजय खोडके,विलास भोयर,दुर्योधन साळवे,जागेश्वर शास्त्रकार,रामचंद्र लेंडे,शंकर खेडकर,गौतम पाटील,जागेश्वर कुथे,अमित वैद्य यासह गावातील शेतकरी वर्ग उपस्थित होते.