पथनाट्याद्वारे मतदार जागृती कार्यक्रम

भंडारा : जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमाद्वारे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध शाळा महाविद्यालय मार्फत कार्यक्रमाद्वारे मतदार जागृती करण्यात येत आहे.

नुकतेच नूतन कन्या महाविद्यालय भंडारा येथील बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनयाद्वारे पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्त्व पटवून दिले. या पथनाट्यमध्ये मतदान, मतदानाचा हक्क, मतदारांची कर्तव्य याबाबत नाटकीय सादरीकरण करण्यात आले. यामध्ये एकूण अकरा विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. गणेशपुर भंडारा येथे आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर जनता विद्यालय तुमसर यांनी देखील या मोहिमेस उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.

पथनाट्य सादर केले या पथनाट्य मध्ये जनता महाविद्यालयातील बारावीचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनय द्वारे मतदानाचे महत्त्व पटवून दिले. प्रज्वल आग्रे, पायल कंकर, रूपाली बनसोड, सविता कांबळे, शिल्पा कांबळे, साक्षी चावके, शितल शेंडे, दिव्या काका मते या विद्यार्थिनींनी मतदानाविषयी माहिती दिली. प्राध्यापक श्री भगत, पटले मॅडम डोंगरवार मॅडम यांनी पथनाट्य सादर करण्यासाठी परिश्रम कले, असे मतदार जागृती कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी तथा नियोजन अधिकारी मानव विकास मृणालिनी भूत यांनी कळवले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

ARMY OPENS SITABULDI FORT ON SWARNIM VIJAY DIWAS

Fri Dec 17 , 2021
Nagpur – UMANG Sub Area opens the “Sitabuldi Fort” to the public of Nagpur on the 50th Anniversary of the Vijay Diwas – marking the victory of Indian Armed Forces over Pakistan on 16 Dec 1971. Nagpurians came out in large number (over 2000) to see this heritage location and buildings during the course of the day. “Sitabuldi Fort”, where […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com