संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका कामठी यांच्या वतीने राबविण्यात आली जत्रा शासकीय योजनांची.
कामठी :- आज कामठी तालुक्यातील अजनी या ठिकाणी जत्रा शासकीय योजनांची या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे व पुढील 15 जून पर्यंत हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत आहे. या जत्रेत सामाजिक न्याय विभाग नागपूर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांचा स्टॉल लावण्यात आलेला आहे. स्टॉलवर विविध शासकीय योजनांची माहिती देताना समता दूत कामठी सुनीता गेडाम व नागपूर शहर येथील समता दूत मंजुषा मडके मॅडम मिळून योजनांची संपूर्ण माहिती स्टॉलवर येणाऱ्या लोकांना देण्यात आली. त्याचप्रमाणे स्टॉलला पुढील मान्यवरांनी भेट देऊन योजनांची माहिती विचारात घेण्यात आली टेकचंद सावरकर आमदार कामठी मौदा विधानसभा क्षेत्र महाराष्ट्र राज्य, आक्षय पोयाम तहसीलदार कामठी, नायब तहसीलदार अमर हांडा,बीडिओ पंचायत समिती कामठी अंशूजा गराटे , किशोर बेले, तालुकाध्यक्ष अनिल निदान विरोधी पक्ष नेते जि. परिषद, दीशा चनकापुरे सभापती पंचायत समिती, दिलीप वानखेडे माजी उपसरपंच शिरपूर, उमेश रडके पंचायत समिती सदस्य व माजी सभापती, गादा ग्रा प सरपंच सचिन डांगे व आजनी ग्रा प सरपंच संजय जीवतोडे महाराष्ट्रात जत्रा शासकीय योजनांची आयोजन बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभाग प्रमुख डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण व समाज कल्याण सहा. आयुक्त सुकेशनी तेलगोटे ,समतादुत जि. प्रकल्प अधिकारी ह्रदय गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त कार्यक्रम पार पाडण्यात आला.