महाराष्ट्र दिन कामगार दिनानिमित्त दानवीर भामाशाह जयंती संपन्न

नागपूर :- बहुजन समाजातील इतिहास शिकण्याचा अधिकार नसल्याने,अनेक कर्तृत्ववान व्यक्तींचा इतिहास बहुजन ओबीसी समाजाला ज्ञात झाला नाही.आज त्या इतिहासाचा शोध घेण्याची गरज नविन पीढीला आहे असे उदगार महाराष्ट्र दिनानिमित्त संताजी सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय तैलिक साहू महासभा , राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि संताजी नवयुवक मंडळ,तर्फे आयोजीत महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे निमित्त साधुन प्रखर देशभक्त शूरवीर दानवीर भामाशाह यांच्या जयंती चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विचारामंचावर प्रमूखअतिथी म्हणुण माजी खासदार सुरेश वाघमारे, केंद्रीय सचिव शरद वानखेडे,उमेश शाहू राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय तैलिक साहू राठोड महासभा राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे,शकील पटेल, सतीश चाफले, परमेश्वर राऊत,गणेश पवार,राजु मोहोड,, कामगार दिनाचे सत्कारमुर्ति अरुण टिकले, मध्यवर्ती कामगार संघटनेचे प्रमुख अशोक दगडे,अशोक अंबागडे, डॉ योगेश भुतेे, योगेश निंबाळकर,मिलिंद चकोले,प्रा. रविद्र येनुरकर, आशिष वांदिले, नंदकिशोर दंडारे, सिताराम साहू या सर्व मान्यवरांचा प्रमुख अतिथी, अध्यक्ष, यांच्याहस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष घाटे यांनी मांडले, तसेच दानवीर भामाशाह यांच्या इतिहासाच्या कर्तृत्वाची माहिती शकील पटेल यांनी उपस्थित श्रोत्यांना सांगितली की महाराष्ट्रात प्रथमच भामाशाह यांच्या जयंतीचा कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी अरुण टिकले यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश सातपुते यांनी केले, समारोपीय आभार परमेश्वर राऊत यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी, प्रवीण बावनकुळे, सुभाष ढबाले , विक्रम मानकर,अनिल गुजरकर, रुपेश कांबळे, प्रकाश कांबळे, गजानन तिरपुडे, आकाश लेंडे, सुभाष ढबाले, सिताराम शाहू, दिलीप शाहू, गजानन दांडेकर, विष्णू बोंद्रे, मंगेश बारई ,सुबोध मांजरे, गणेश हांडे ,निलेश चांदेकर, राजू झाडे, योगेश सातपुते, बंटी घनमारे अक्षय हटवार ,गजू डफ, दिनेश मांगलकर, पंकज वंजारी, गिरीश महाजन, सुभाष तडस, आणि इतर सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ' चे थाटात उद्घाटन

Tue May 2 , 2023
रामटेक :- रामटेक तालूक्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आज दि.१ मे रोजी सुतिका गृह, रामटेक येथे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना”चे उदघाटन आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागिय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार हंसा मोहने, शिवसेना तालुका प्रमुख विवेक तुरक, जि.प.सदस्य संजय झाडे, सतिश डोंगरे, पं.स. सभापती संजय नेवारे, माजी न.प.सभापती बिकेंद्र महाजन, माजी नगरसेवक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com