किडनी स्टोन आजारावर मात करण्यासाठी ‘क्रश कॅप्सुल’ लाँच, कार्यक्रमाचे भव्य उद्घाटन 6 फेब्राुवारीला

– संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अॅप्रोप्रिएट डायट आयुर्वेदा, आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांचा संयुक्त उपक्रम

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, मे. अॅप्रोप्रिएट डायट आयुर्वेदा, नागपूर आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने किडनी स्टोन (मुतखडा/ मुत्राश्मरी) आजारावर मात करण्यासाठी ‘क्रश कॅप्सुल’ लाँच करण्याचा भव्य उद्घाटन कार्यक्रम दि. 6 फेब्राुवारी, 2024 रोजी अॅप्रोप्रिएट आयुर्वेदा, एम.आय.डी.सी., बुटीबुरी, नागपूर याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. किडनी स्टोन वर मात करण्यासाठी हा पहिला आयुर्वेदिक प्रयोग आहे.

उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अॅप्रोप्रिएट ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक तथा शास्त्रज्ञ भारतगौरव डॉ.एस. कुमार भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते उपस्थित राहतील. कार्यक्रमाला राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबईचे अध्यक्ष तथा नामवंत शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.

तरी सदर उद्घाटन कार्यक्रमाला जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, जीवतंत्रशास्त्र विभागातील वरीष्ठ प्राध्यापक डॉ. अनिता पाटील, अॅप्रोप्रिएट आयुर्वेदाच्या संचालक डॉ. भाग्यश्री व नेचर सोल कंपनीचे संचालक अविनाश तांबे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कर्मयोगी पर्वाची प्राणज्योत मालवली!

Sun Feb 4 , 2024
भाजपा नेते राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांचे वडील सुखदेवराव रामभाऊ बोंडे यांचे शनिवारी (ता.३) वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. महानगरपालिकेच्या शाळेवर अध्यापनाचे कार्य करत ते मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. आयुष्यभर अविरत संघर्ष करून त्यांनी मुलांना चांगले शिक्षण दिले. संस्कारक्षम बनवले. चारही मुलांनी विविध क्षेत्रात सर्वोच्च यश गाठले यासह प्रगतशील समाज निर्मिती व्हावी यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com