मौदा :- अंतर्गत मौजा / समतानगर भंडारा ३० किमी पूर्व यातील फिर्यादी चे लग्न आरोपी नामे डॉ. रामदास गणेस निपाने वय ३० वर्ष भंडारा याचे सोबत दि. १६/११/२०२१ रोजी रितीरिवाजाप्रमाणे झाले लग्न झाल्यानंतर फिर्यादीचे पति रामदास निपाने, गणेस निपाने (सासरे), कल्पना गणेस निपाने (सामु) सर्व रा भंडारा यांनी फिर्यादीस नविन दवाखाना टाकण्याकरीता माहेरून दोन लाख रूपये ची मागणी केल्याने, फिर्यादीने पैसे देण्यास मनाई केल्याने आरोपी यांनी फिर्यादीस नेहमी घरघुती कारणावरून “तु काम करत नाही, तुला स्वयंपाक येत नाही” असे म्हणुन शारीरीक व मानसीक त्रास देवून हुंड्याची मागनी केली. सदर प्रकरणी फिर्यादी नामे- दिक्षा रामदास निपाने वय २४ वर्ष रा समता नगर फेज २ मेढ़ा रोड भंडारा ह. मु लक्षी नगर प्लॉट २२ मौदा जिल्हा नागपुर यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे नमुद आरोपी यांचे विरुध्द कलम ४९८ (अ) भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो हवा असलम नवरगावादे पोस्टे मौदा हे करीत आहे..