बोधिमग्गो येथे बुद्ध जयंती – वेसाक उत्सव प्रारंभ

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

नागपुर :- बोधिमग्गो महाविहार (भदन्त बोधिवविनीत महाथेरो स्मृति परिसर), इसासनी-भीमनगर, हिंगना रोड, नागपूर येथे गुरुवार, दिनांक 23 मे 2024 ला “बुद्ध जयंती – वैशाख पौर्णिमा” पवित्र दिनी उपोसथ, धम्मदेसना तसेच अनेक प्रकार च्या स्पर्धा, धम्म रैली, संघदान, भोजनदान कार्यक्रमाला शुरूवात झालेली आहे.

कार्यक्रमा चे उद्घाटन प्रसंगी पुज्य भदन्त नागदिपंकर महाथेरो, डाॅ. भदंत सीलवंस महास्थविर, भदंत महानाम, भदंत सुजाततिस्स, अरविंद ढोणे (सरपंच – इसासनी-भीमनगर ग्रामपंचायत) आदि मान्यवरांच्या उपस्थितित पार पडले.

लता मंगेशकर हास्पिटल व रक्त पेढी तसेच रणजीत देशमुख दंत महाविद्यालय, हिंगना रोड, नागपूर द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरा करीता बोधिमग्गो सेवा संस्था, ग्रामपंचायत, इसासनी-भीमनगर आणि परिसरातील रक्तदाते यांच्या सहभागातुन भदंत सीलवंस थेरो, भदंत महानाम, आयुष्मान स्वप्निल गजभिये, टिनु बोंदाडे, पवण हाडके, चेतन हाडके, रितेश वानखेडे, विलास तंतरपाळे, विनोद बाराहाते, संदेश गजभिये, अंशुल कांबळे, आशिष वानखेड़े, मनोज मेश्राम, दिनेश कळसकर, रवि इंगोले (शिक्षक), निखिल झोडापे आदिनी रक्तदान केले व अनेक उपासक उपासिकांनी दंत तपासणी केली.

या कार्यक्रमाला यशस्वीतेने संपन्न करण्याकरिता बोधिमग्गो संडे स्कूल टीम, बोधिमग्गो वेलनेस सेंटर, भदन्त नाग दिपंकर, भदन्त सुजाततिस्स, अरविंद ढोणे (सरपंच-इसासनी ग्रामपंचायत), शंकरराव निकोसे, एन. टी. मेश्राम, सहादेव बांगर, दुर्वास साखरे, मनोहर येनोरकर, ज्ञानेश्वर मुंजनकर, अमित गणविर, कमलेश मेश्राम व प्रणय साखरे आदिंचे सहकार्य लाभले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

77 व्या कान चित्रपट महोत्सवात एफटीआयआयच्या विद्यार्थ्याने पटकावला ‘ला सिनेफ’ पुरस्कार

Sat May 25 , 2024
– एफटीआयआय चे विद्यार्थी चिदानंद एस नाईक (दिग्दर्शक) आणि त्यांच्या चमूच्या “सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो “ चित्रपटाने कानमध्ये केली चमकदार कामगिरी. – चिदानंद एस नाईक – ‘75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ पैकी एक आणि एफटीआयआय च्या 2022 च्या तुकडीतील विद्यार्थी नवी दिल्ली :- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) चे विद्यार्थी असलेल्या चिदानंद नाईक यांच्या “सनफ्लॉवर्स […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com