त्रिस्तरीय ५२ प्रभाग ; एकूण १५६ सदस्य

मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर

नागपूर, ता. १ : नागपूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकीची प्रारूप प्रभाग रचना मंगळवारी (ता.१) जाहीर करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण १५६ सदस्यांकरीता ५२ प्रभागाचे प्रारूप नकाशे जाहीर करण्यात आले. जाहीर सर्व ५२ प्रभाग ३ सदस्यांचे आहेत.

          नागरिकांची प्रभाग रचना बघण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून सर्व प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे हे नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय मनपाचे सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालय व सर्व झोन कार्यालयांमध्ये प्रभाग रचनेचे नकाशे प्रदर्शित करण्यात आले आहेत. प्रभाग रचनेवर काही हरकती व सूचना असल्यास त्या १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंत मनपा निवडणूक कार्यालय सिव्हिल लाईन्स किंवा संबंधित क्षेत्रीय (झोन) कार्यालय येथे जमा करावे. हरकती व सूचना दाखल करण्याऱ्या नागरिकांना सुनावणी करीता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

          राज्य निवडणूक आयोगाच्या २८ जानेवारी २०२२च्या पत्रान्वये आरक्षणाची सोडत नंतर काढण्यात येणार आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

नदी, नाल्यांच्या काठावरील अतिक्रमणाविरुद्ध मनपा करणार कारवाई

Wed Feb 2 , 2022
-उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तातडीने कारवाई सुरू करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश नागपूर  : नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे नाग नदी, पिली नदी आणि पोहरा नदी तसेच नाल्यांच्या काठावर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांच्या विरुद्ध मोठी कारवाई केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनपा आणि राज्य शासनाला अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने मनपामध्ये आयुक्तांच्या सभाकक्षात आयोजित एका बैठकीत सर्व अधिका-यांना कारवाई करण्याचे निर्देश मंगळवारी (ता.१) निर्गमित करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com