कोदामेंढी :- मागील सहा महिन्या पूर्वीपासून कन्हान ते अरोली या 30 किमी,112 कोटी रुपये खर्चा चे रस्त्याचे बांधकाम अत्यंत कासवगतीने सुरु असून कन्हान येथे जाणारा मुख्य रस्ता बंद आहे, त्यामुळे या मार्गॉवरील संपूर्ण बसफेरयाही बंद आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाची गती वाढविण्याची मागणी बोरी सिंगारदीप गट ग्राम पंचायत सरपंच दिलीप इंगोले यांनी केली आहे. याबाबत रस्त्याचे बांधकाम करणारे हर्ष कंस्ट्रक्शन कंपनी चे संयोजक राजेंद्र सैनी यांना भ्रमणध्वनिवरुण विचारपूस केली असता, त्यांनी पुन्हा 1 ते 2 वर्ष संपूर्ण रस्ता बंधकामाला लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा 1 ते 2 वर्ष या रस्त्याशेजारी राहणाऱ्या गावातील नागरिकांना वाहतुकीचा कमालीचा त्रास होणार आहे, हे विशेष.कारण संपूर्ण रस्ता अनेक ठिकाणी पायल्या ताकन्यासाठी खोदून ठेवला आहे, असे तुमाण येथील नागरिकान्नी सांगितले.
कन्हान ते अरोली रस्त्याच्या बांधकामाची गती वाढवा – सरपंच दिलीप इंगोले
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com