राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

नागपूर- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2022 ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2023 असा आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

NewsToday24x7

Next Post

शहराचा ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी ‘हेरिटेज वॉक’ मनपा व नागपूर@२०२५ चा पुढाकार

Tue Jan 24 , 2023
नागपूर : नागपूर शहरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती नव्या पिढीला व्हावी, शहरातील समृद्ध वारस्याचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने नागपूर@२०२५ च्या वतीने ‘हेरिटेज वॉक’ चे रविवारी (ता.२२) आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त गजेंद्र महल्ले, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, सतरंजीपूरा झोनचे सहाय्यक आयुक्त घनश्याम पंधरे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेन्द्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com