तीन सराईत गुन्हेगार ताब्यात, १ कट्ट्यांसह जिवंत काडतुस जप्त

नागपुर – सुपारीचे गोडावुनला लागलेल्या लोखंडी गेटचे कडी कोंडा तोडुन गोडावुनमध्ये  प्रवेश करून गोडावुनमध्ये  ठेवलेले सुपारी कटींग, प्रोसिजीग केलेले एकुण 14 बोरे, प्रति बोरा 70 किलो प्रमाणे एकुण 980 किलो, सुपारी प्रति किलो 500/रू. प्रमाणे एकुण 4,90,000/रू. 2) CCTV  कॅमेराच्या  डि.व्ही.आर. कि.अं. 4,450/रू. असा एकुण 4,94,450/रू. चा मुद्देमाल चोरी केला आहे .अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. नमुद गुन्हयातील पाहीजे सराईत आरोपीत इसम नामे शुभम महेद्र मराठे, वय 24 वर्ष  रा. नवीन नगर, शितला माता मंदिर बाजार चौक, नागपूर हा मागील एका महीन्यापासुन फरार होता .नमुद पाहीजे आरोपीत इसमाबाबत गुप्त बातमीदाराने दिलेल्या बातमी  प्रमाणे आरोपीस सापळा रचुन दि. 12/03/2022 रोजी साखरकर वाडी डिप्टी सिग्नल येथुन ताब्यात घेवुन त्याचेकड़े गुन्हयाबाबत चौकशी करून त्याचा गुन्हयामध्ये सक्रीय सहभाग असल्याने त्यास गुन्हयामध्ये अटकेची कारणे सांगुन अटक केली आहे. नमुद आरोपीत इसमाचा मा. न्यायालयाकडुन पी.सी.आर. मंजुर करून त्याचेकडे गुन्हयाचा तपास केला असता त्याने पंचासमक्ष दिलेल्या कबुली निवेदन मेमोरंडम पंचनामा कारवाई केली असता त्याचेकडुन 1) सुपारी कटींग, प्रोसिजीग केलेले सुपारीने भरलेले एकुण 02 बोरे, प्रति बोरा अं. 70 किलो प्रमाणे एकुण 140 किलो, सुपारी प्रति किलो 500/रू. प्रमाणे एकुण 70,000/रू. 2) काळया रंगाची पल्सर 220 दुचाकी गाडी क्र. एम.एच. 31 डी.टी 9608 कि.अं. 80,000/रू. 3) एक देशी बनावटीचा कट्टा पिवळसर धातुची बॉडी व लोखंडी बॅरेल कि.अं. 10,000/रू. 4) एक देशी बनावटीच्या कट्टयाचा जिवंत काडतुस कि.अं. 5,00/रू. असा एकुण 1,60,500/रू. चा माल हस्तगत केला आहे.

नमुद गुन्हयाचा तपास करीत असतांना दि. 15/02/2022 रोजी आरोपी क्र. 1) विजय उर्फ काल्या कंसराम निर्मलकर वय 32 वर्श रा. चिखली 70 एन.आय.टी.क्वॉर्टर, जगदीश पाठे यांचे घरी, कळमना  मार्केट  जवळ, पो.स्टे. कळमना, नागपुर 2) देवनाथ प्रकाश वाडीभस्मे वय 31 वर्श रा. वार्ड नं. 04, राई नगर, बी.एस.एन.एल. टॉवर जवळ, पो.स्टे. कन्हान जि. नागपुर यांना गुन्हयामध्ये अटक करून त्यांचेकडुन 1) एक लोखंडी कटोनी कि.अं. 200/रू. 2) सुपारी कटींग, प्रोसिजीग केलेले सुपारीने भरलेले एकुण 12 बोरे, प्रति बोरा अं. 70 किलो प्रमाणे एकुण 840 किलो, सुपारी प्रति किलो 500/रू. प्रमाणे एकुण 4,20,000/रू. 3) सि.सि.टी.व्ही.कॅमेराच्या डि.व्ही.आर. कि.अं. 4,450/रू. 4) सि.सि.टी.व्ही. कॅमेरायांचे डि.व्ही.आर. चे स्टॅपिलायझर कि.अं 500/रू. 5) जुनी वापरती मारूती सुझुकी कंपनीची चार चाकी ओमनी गाडी क्र . एम.एच. 31 सि. एन. 7041 कि.अं. 2,00,000/रू. असा एकुण 6,25,150/रू. केलेला आहे. नमुद गुन्हयामधील चोरीस गेलेला संपुर्ण माल गुन्हयातील तीन आरोपीतांकडुन हस्तगत करून आज पावेतो एकुण 8,05,650/रू. चा माल हस्तगत केला आहे. नमुद गुन्हयातील आरोपी क्र. 03 नामे शुभम मराठे याचेकडे एक देशी बनावटीचा कट्टा पिवळसर धातुची बॉडी व लोखंडी बॅरेल कि.अं. 10,000/रू. 4) एक देशी बनावटीच्या कट्टयाचा जिवंत काडतुस कि.अं 5,00/रू. असा माल मिळुन आल्याने गुन्हयामध्ये 3+25 भा.ह.का. सह कलम 135 म.पो.का.प्रमाणे कलम वाढ करण्यात आलेली आहे.

सदर कारवाई मनिश कलवानिया, पोलीस उपायुक्त  परि. क्र. 05 नागपुर शहर,  नयन आलुरकर सहा. पोलीस आयुक्त, कामठी विभाग नागपुर यांचे मार्ग दर्शनात  वरिष्ठ  पोलीस निरीक्षक, विनोद पाटील, पोलीस निरीक्षक,(गुन्हे)  विनोद गोडबोले  सपोनि राहुल डोंगरे, स.फौ.  अजय गर्जे, पो.हवा.  दिपक धानोरकर, पो.हवा. प्रविण लांडे, ना.पो.शि. अभय साखरे, ना.पो.शि. अशोक तायडे, पो.शि. सचिन दुबे, दिनेश  यादव, अनिल जाधव सर्व पोस्टे. कळमणा नागपुर षहर यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी तालुक्यातील 10 मुख्यपरीक्षा केंद्रावरून दहावीची परीक्षा सुरळीत

Tue Mar 15 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 15:- आज 15मार्च पासून कामठी तालुक्यात दहावीची परीक्षा सुरू झाली असून 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत होणाऱ्या 10 वीच्या परिक्षेकरिता कामठी तालुक्यातील 10 मुख्य व 31 उपमुख्य असे एकूण 41 परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा सुरळीत सुरू झाली असून आजचा भाषा पहिला पेपर सुरळीत पार पडला . महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com