वेकोलि खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यास देशी माऊजर ने गोळी मारणारे दोन आरोपी अटक..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

(दि.१५) डिसेंबर पर्यंत आरोपीचा पीसीआर, जख्मी सुरक्षा कर्मचारी मुत्युशी झुंज देत आहे.  

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि इंदर खुली खदान नं.६ येथील मँनेजर रूमच्या मागे कोल डेपो व वजन काटया जवळ मिलींद खोब्रागड़े यांचा सह दोन सुरक्षा कर्मचारी पेट्रोलिंग करीत असतांना आरोपी समीर सिद्धिकी, राहुल जेकब हे दुचाकी वाहनाने प्रति बंधीत क्षेत्रात आल्याने मिलींद खोब्रागडे ने त्यांना पुढे जाण्यास मनाई केली असता आरोपी समीर ने शिविगा ळ करून मिलींद वर देशी माऊजर दोन गोळया मारू न गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी आरोपीला अटक करून पोस्टे ला दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.११) डिसेंबर ला दुपारी ४ वाजता महा.सुरक्षा रक्षक मिलींद खोब्रागडे वेकोलि इंदर खुली खदान नं.६ येथील मँनेजर रूमच्या मागे कोल डेपो व वजन काटयाजवळ पेट्रोलिंग करित होता. त्याचे मागे थोड्या अंतरावर महेश वामनरावजी नासरे वय ३४ वर्ष ह.मु. सीएमपीडी आई कॅंम्प सब एरीया ऑफिस काॅलोनी खदान नं ३ सह राहुल बेलख डे व शमीक असे तीघे पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा आरोपी समीर सिद्दीकी व राहुल जेकब हे होंडा सीडी डिलेक्स क्र एम एच ४० – आर – ६२७२ दुचाकीने मॅने जर रूम मागुन प्रतिबंधित क्षेत्रात कोल डेपोकडे जात असल्याने मिलींद खोब्रागडे याने त्यांना पुढे जाण्यास मनाई केली. त्या दोघांनी मिलींद खोब्रागडे शासकीय कर्तव्य बजावित असतांना त्याचे सोबत शिविगाळ करून धक्काबुक्की केली आणि आरोपी समीर सिद्दी की याने त्याचे जवळील देशी माऊजर काढुन मिलींद खोब्रागडे च्या दिशेने त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्दे शाने दोन गोळ्या झाडुन कमरेवर मारल्याने तो खाली पडल्यावर त्याच्या डोक्यावर तिसरी गोळी मारून गंभी र जखमी केले. आरोपी राहुल जेकब ने मध्ये हात आडवल्याने एक गोळी त्याच्या डाव्या हाताच्या पंजा ला मागील बाजुस गोळी लागली. आरोपीने गोळीबार करून जात माऊजर हवेत ऊंचावुन परिसरात दहशत पसरवुन भीतीचे वातावरण निर्माण केल्याने परिसराती ल लोक सैरावैरा पळु लागले. काही लोकांनी आपल्या घराचे दारे व खिडक्या बंद केल्या तसेच एक चाय टपरी वाला भीतीने टपरी बंद करून पळुन गेला. काही वेळातच महेश नासरे यांनी लगेच ऑफिस मधिल गार्ड सोनु देविया यास बोलावुन ऑफिसच्या गाडीने मिलींद खोब्रागडे ला गाडीत टाकुन उपचाराकरीता जे.एन दवा खाना कांद्री-कन्हान येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्यास रेफर केल्याने खाजगी आशा हॉस्पीटल कामठी येथे दाखल केले. (दि.१२) ला मिलींद याची शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आली आणि पुढील उपचार सुरू असुन मिलींद सध्या ही मुत्युशी झुंज देत असल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलल्या जात आहे.

सदर प्रकरणी स्थानिय गुन्हे अन्वयेशन शाखा नागपुर ग्रामिण पथक व कन्हान पोलीसानी आरोपी समीर सिद्धिकी व राहुल जेकब यांस ताब्यात घेऊन

फिर्यादी महेश नासरे यांचे तक्रारीने कन्हान पोलीसां नी पोस्टे ला दोन्ही आरोपी विरुद्ध कलम ३०७, ३५३ भादंवी ३/२५ ऑरम अँक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. सोमवार (दि.१२) कामठी न्यायालयात हजर केले असता मा. न्यायाधिशा नी दोन्ही आरोपी चा तीन दिवसाचा म्हणजे (दि.१५) पर्यंत कन्हान पोलीसांना पुढील तपासा करिता पीसीआर दिला आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com