नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज विभागीय लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी प्रलंबित चार तक्रारींचा आढावा घेण्यात आला आणि तीन तक्रारी निकाली काढण्यात आल्या.
उपायुक्त घनश्याम भुगावकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिन पार पडला. यावेळी नागपूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यकक्षेतील दोन आणि वर्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेतील एक अशा एकूण तीन तक्रारींवर कार्यवाही करून या तक्रारी निकाली काढण्यात आल्या . तसेच, प्रलंबित चार तक्रारींचा आढावा घेण्यात आला.
नायब तहसिलदार आर.के.दिघोळे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांच्यासह सहकार, आरोग्य, महापालिका, महिला व बाल विकास, भूमापन, लेखा व कोषागारे आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.