‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सह संचालक डॉ. विवेक पाखमोडे यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सह संचालक डॉ. विवेक पाखमोडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

जगभरात तोंडाचे आरोग्य सुधारावे यासाठी दरवर्षी 20 मार्च रोजी ‘जागतिक मौखिक आरोग्य दिन’ पाळाला जातो. या दिनानिमित्त नागरिकांमध्ये सजगता यावी यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. मौखिक आरोग्याचा मनुष्याच्या सामान्य आरोग्याशी घनिष्ठ संबंध असून दातांची कीड, हिरड्याचे आजार, मुखदुर्गंधी, तंबाखुमुळे होणारे मुखाचे आजारांचा प्रामुख्याने मौखिक आरोग्यात समावेश होतो. वाढत्या वयानुसार होणाऱ्या आजारांचा आणि औषधांचाही ज्येष्ठांच्या मौखिक आरोग्यावर परिणाम होतो. त्याअनुषंगाने मौखिक आजाराचे प्रकार आणि या आजारांबाबत काय काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबत ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सह संचालक डॉ. पाखमोडे यांनी माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. पाखमोडे यांची मुलाखत बुधवार दि. 20, गुरुवार दि. 21 आणि शुक्रवार दि.22 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ऐकता येणार आहे, तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 20 मार्च 2024 रोजी दुपारी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक रितली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘डबल हॉर्स पॉवर’ने होईल चंद्रपूर जिल्ह्याचा विकास ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

Wed Mar 20 , 2024
– सर्व धर्मीय बांधवांकडून चंद्रपूरमध्ये जल्लोषात स्वागत – चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा निर्धार चंद्रपूर :- सकाळपासून माझ्या सोबतचे पदाधिकारी, कार्यकर्ते सख्ख्या भावाप्रमाणे कष्ट घेत आहेत. महिला कार्यकर्ता सकाळपासून माझ्या स्वागतामध्ये आहेत. सर्वसामान्य जनतेनेही मला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. आतापर्यंत विधानसभेच्या माध्यमातून जिल्ह्याचे प्रश्न सोडवले आता विधानसभेसह लोकसभेचीही कामे होतील आणि ती देखील ‘डबल हॉर्स पॉवर’ने होतील, असा विश्वास राज्याचे वने, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com