– पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी चिमुकल्यांची धडपड
नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्त नागपूर साकारण्यासह पर्यावरण संवर्धन करिता एक पाऊल पुढे टाकत शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी साडेतीन हजारावर इको ब्रिक्स संकलित केले आहे. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर@२०२५च्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित इकोब्रिक्स महोत्सव २०२४ दरम्यान शहरातील दहाही झोन अंतर्गत येणाऱ्या विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी ३ हजार ५८१ इको ब्रिक्स संकलित केले आहे.
नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील विविध शाळांमध्ये इको ब्रिक्स महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, यादरम्यान शाळांमध्ये तज्ञांमार्फत विद्यार्थ्यांना इको ब्रिक्स संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी चिमुकल्यांनी धडपड करीत इको ब्रिक्स ची निर्मिती केली. हे इको ब्रिक्स मनपाचे दहाही झोनचे सहाय्यक आयुक्त आणि नागपूर@२०२५च्या स्वयंसेवकांनी सहकार्याने संकलित करण्यात आले. यात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या बीआरए मुंडले शाळा येथून १६४ ,कुर्वे मॉडेल स्कूल येथून ६०,विवेकानंद नगर मनपा शाळा येथून १०६, भवन्स स्कूल त्रिमूर्ती नगर येथून ८२४, धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या सरस्वती विद्यालय येथून ६३०, हनुमान नगर झोन अंतर्गत येणाऱ्या स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळा येथून ४०,आदर्श संस्कार विद्यालय येथून ११०,इंदिरा गांधी शाळा येथून २०,दुर्गा नगर मनपा शाळा येथून ३७,गजानन शाळा येथून २०, विकास पब्लिक स्कूल २५, वंदे मातरम शाळा येथून ३५, धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या मनवता शाळा येथून ७०, आंबेडकर शाळा येथून ४०, राधे हायस्कूल वेणू कॉर्नर येथून ३९, नेहरू नगर झोन अंतर्गत येणाऱ्या वाठोडा मनपा स्कूल, वाठोडा जुनी वस्ती येथून २०, विश्वास माध्यमिक शाळा, श्रीकृष्ण नगर येथून २५ , नवप्रतिभा हायस्कूल, आयुर्वेदिक ले आउट येथून ५०, राजाबाळ हायस्कूल, उमरेड रोड येथून, २०, मनपा ताजबाद उर्दू माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथून २२, ठाकरे हायस्कूल, आशीर्वाद नगर येथून ३०, मनपा दत्तात्रेय नगर शाळा, दत्तात्रेय नगर येथून २५, मनपा बिडीपेठ उच्च माध्यमिक विद्यालय, दत्तात्रेय नगर येथून १५, संजूबा हायस्कूल येथून ५२, सुर्वे लेआउट गांधीबाग झोन अंतर्गत येणाऱ्या पन्नालाल शाळा येथुन ६०, गोवर्धनदास रॉयल स्कूल येथून ६०,छत्रपती विद्यालय येथून ४५, टाटा पारसी शाळा येथून २७५ न्यू इंग्लिश स्कूल येथून१००, सतरंजीपूरा झोन अंतर्गत येणाऱ्या सिद्धार्थ हायस्कूल, न्यू मंगळवारी येथून १८, सलामे इंग्लिश कॉन्व्हेंट, शांती नगर येथून २२, ग्रेट ब्रिटन स्कूल, शांती नगर येथून २०, भिवगडे कॉलेज, शांतीनगर येथून १८, नॉर्थ पॉइंट स्कूल, पंच देओल बस्तरवार येथून ३५, लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या आदर्श हायस्कूल, हिरवी नगर येथून ३०, प्रशांत हायस्कूल, हिरवी नगर येथून २५, विनायकराव देशमुख हायस्कूल, लकडगंज येथून ४५, सेंटर पॉइंट स्कूल, वर्धमान नगर येथून २४५, विद्या विजय हायस्कूल, पारडी येथून २०, नमो नारायणी कॉन्व्हेंट, भरतवाडा रोड येथून २०, मंगळवारी झोन अंतर्गत येणाऱ्या ब्लू डायमंड स्कूल, बोरगाव रोड येथून १०, राजकुमार केवलरामणी हायस्कूल, जरीपटका येथून ११ ,बोरगाव उच्च प्राथमिक शाळा, कुमरद्दीन लेआउट येथून १८, किड्स वर्ल्ड स्कूल, झिंगाबाई टाकळी येथून १२, आरकेएस पब्लिक स्कूल, गजानन नगर नारा जरीपटका येथून १३ असे एकूण ३ हजार ५८१ इको ब्रिक्स संकलित करण्यात आले आहे.
इको ब्रिक्स म्हणजे प्लास्टिकच्या कचऱ्याने भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या. हे इको ब्रिक्स बांधकाम साहित्य म्हणून वापरल्या जाऊ शकतात. अशा कार्याने पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला गती मिळेल, नागरिकांनी देखील अशा प्रकारच्या इको ब्रिक्स तयार करावे व धरमपेठ झोन कार्यालय येथे आणून द्यावे असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.