नागपूर :- पोलीस ठाणे गणेशपेठ हहीत, बी/७, राहुल कॉम्प्लेक्स नंबर १, एसटी स्टॅण्ड चौक, गणेशपेठ, नागपूर येथे राहणारे फिर्यादी शैलेन्द्र कृष्णभुषन चौधरी, वय ५१ वर्षे यांनी जुडीओ (ट्रेन्ट लिमीटेड) टाटा इंटरप्राईजेसचे स्टोअर टाकण्याकरीता जुडीओच्या वेबसाईटवर अर्ज केलेला होता. आरोपींनी संगणमत करून बनावट मेल आयडी तयार करून त्याद्वारे फिर्यादीला बनावट फार्म पाठविला व फिर्यादीकडून रजिस्ट्रेशन तसेच ईतर प्रक्रीयेकरीता फिर्यादी कडुन वेळो वेळी एकुण २०,३५,५००/- रू ऑनलाईन घेवुन रक्कम परत न करता फिर्यादीची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सायबर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ भा.दं.वि., सहकलम ६६(ड) आय.टी. अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला होता.
नमुद गुन्हयाचे तपासादरम्यान सायबर पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून फिर्यादीची रक्कम ज्या बँकेचे खात्यावर जामा झालेली होती. व तेथुन आरोपींनी एटीएम द्वारे रक्कम काढून विल्लेवाट लावल्याचे निष्पन केले व कायदेशीर कार्यवाही करून शोध घेवुन नालंदा बिहार येथुन आरोपी १) गणेश सरयुग पासवान वय ३९ वर्ग २) रविरंजनकुमार योगेन्द्र पासवान वय २५ वर्ष ३) रोहीतकुमार सहदेव पासवान वय २२ वर्ष तिन्ही रा. बिहारीविधा, पोस्ट माफी, पंचायत कटहरी, जि. नालंदा, बिहार यांना ताब्यात घेवुन अटक केलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. आरोपींना मा. न्यायालया समक्ष हजर करून त्यांची पोलीस कोठडी प्राप्त केलेली आहे. वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि, अमीत डोळस, पोनि, अमोल देशमुख, सपोनि. विवेक लामतुरे, पोहवा, शैलेष निघुट, नापोअं. प्रफुल जनबंधू, पोअं. योगेश काकड व रोहीत मटाले यांनी केली.