नागपूर :- पो. ठाणे हुडकेश्वर बेलतरोडी हद्दीत प्लॉट नं. ३०५ पार्वता अपार्टमेंट, रूखमीनी मंदींर जवळ, बेलतरोडी, नागपुर येथे राहणारे फिर्यादी अमरीश महेशचंद्र दवे, वय ४० वर्ष त्यांचे पुरुषोत्तम बाजार चौक, बेलतरोडी येथे मोबाईल शॉपीचे दुकान असून, ते दि. ०५.०९.२०२३ रात्री २३,०० वा. दुकान बंद करून घरी गेले. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे दुकानातील खिडकी तोडुन दुकानात प्रवेश करून, दुकानातील वेगवेगळया कंपनीचे १० मोबाईल हँडसेट बोट कपनीच्या १० घडयाळी व नाईस कंपनीच्या २६ घडयाळी असा एकुण किंमती अंदाजे २,०४,५००/- रु. मुद्देमाल चोरून नेला. याबाबत दुकानातील सि.सि. टी. व्ही. कॅमेरा चेक केला असता, दोन इसम चोरी करतांना कॅमेऱ्यात दिसुन आले होते. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे बेलतरोडी येथे अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८० भादवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात बेलतरोडी पोलीसांनी प्राप्त सि.सी.टी.व्ही फुटेज वरून तसेच तांत्रीक तपास करून गुन्हयातील आरोपी यांना निपन्न केले. व सापळा रचुन आरोपों क्र. १) उमेश प्रकाश चौधरी वय २७ वर्ष रा. चंद्रमणी चौक, वाडी, नागपूर २) मनवर उर्फ मलबा उर्फ सोनू गुलामनबी अंसारी वय २४ वर्ष रा. बालाजी नगर, बेलतरोडी, नागपूर ३) शिव बाबुराव गुरले वय २१ वर्ष रा. मेहर नगर, चांदमारी, वाठोडा, नागपूर यांना ताब्यात घेवुन त्यांची सखोल विचारपूस केली असता आरोपींनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेला आहे. आरोपाचे ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाला पैका वेगवेगळया कंपनीचे एकुण १९ मोबाईल ३ स्मार्ट वॉच व गुन्ह करतांना वापरलेल्या दोन अॅक्टीव्हा मोपेड वाहने असा एकूण ४,२९.३९८ / – रुचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपास सुरू आहे. वरील कामगिरी पोलिस उपआयुक्त परी क. ०४, नागपुर शहर, सहा पोलिस आयुक्त अजनी विभाग, नागपुर शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरिक्षक मुकुंद कवाडे, सपोनि पंकज काकडे, सबै राजेश चुगे, पोहवा, तेजराम देवळे, शैलेष बडोदकर, जयंत शंभरकर, अरुण सातपुते, नापोशि सुमेंद्र बोपचे, अंकुश चौधरी,पोशि विवेक श्रीपाद, हेमंत उईके, कुणाल लांडगे, रितेश गोतमारे, अमोल शिटि, दिपक तन्हेकर, कुणाल उके यांनी केली आहे.