नागपूर :- दिनांक २१.०९.२०२३ चे २२.०० वा. च्या सुमारास पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत कोराडी नाका कडे जाणाऱ्या रोडवर सोनू पानठेल्या समोरून फिर्यादी स्वप्नील भास्कर भैसारे, वय ३१ वर्षे, रा. प्लॉट नं. ४७, इंडियन कॉलोनी, नारा, जरीपटका, नागपूर हे पायदळ घराकडे जात असता, बर बाकी टाटा एस क्र. एम.एच ३१ सि.क्यू ४०९४ ये चालकाने त्यांचे ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणे तसेच भरधाव वेगाने चालवून फिर्यादीला धडक देवून गंभीर जखमी केले व स्वतः ईलेक्ट्रीक पोलला जावून धडकला. गाड़ी बंद झाल्याने आरोपी गाडी सोडून पळुन गेला. फिर्यादी यांचे डोक्याला व दोन्ही हातापायाला मार लागल्याने त्यांना उपचाराकरीता कुणाल हॉस्पीटल येथे दाखल केले आहे. फिर्यादीने हॉस्पीटल मध्ये दिलेल्या बयाणावरून पो. ठाणे जरीपटका येथे पोउपनि टेकाडे त्यांनी आरोपी टाटा एस चालकाविरुद्ध कलम २७९, ३३७, ३३८ भादवि सहकलम १३४ मो.वा. का अन्वये गुन्हा नोंदवुन पुढील तपास करीत आहे