संपाचा तिसरा दिवस,तिसऱ्या दिवशीही कार्यालयात सामसुम..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 16 :- जुनी पेन्शन लागू करा या मुख्य मागणीला घेऊन कर्मचारी संघटनांकडून 14 मार्च पासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला कामठी तालुक्यातील कर्मचारी संघटनांनी पाठींबा देत बेमुद्दत संपात सहभाग नोंदविला .आज या बेमुद्दत संपाचा तिसरा दिवस असूनही संप कायम आहे ज्यामुळे शासकीय कार्यालयाचे कामकाज ठप्प पडले आहेत.कार्यालयात कर्मचारी अनुपस्थित असल्यामुळे कार्यालयाचे उघडे दार आणि रिक्त पडलेले टेबल खुर्च्या असे सामसूम वातावरण दिसून येत आहे तर दुसरीकडे कामठी तालुक्यातील काही कार्यालयात कंत्राटी कर्मचारी सेवा पुरवित आहेत.

जोपर्यंत राज्य शासन मागणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार अशी अटळ भूमिका कर्मचारी संघटनेच्या वतीने घेण्यात आले आहे ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकही अडचणीत अडकले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात होणार जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल

Thu Mar 16 , 2023
-आंतर क्रीडा संकुल उभारण्याकरिता महाराष्ट्र शासनाने दिली मान्यता नागपूर :-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जागतिक दर्जाचे आंतर क्रीडा संकुल साकारले जाणार आहे. अत्याधुनिक सोयी सुविधा असणारे आंतर क्रीडा संकुल होणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्व प्रथम विद्यापीठ ठरणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष महोत्सवाच्या निमित्ताने जागतिक दर्जाचे आंतर क्रीडा संकुल उभारण्याकरिता महाराष्ट्र सरकारने ४४ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com