– सुंदर शिवाजी प्रतिमेचे देखाव्या सह मनमोहक झाकी व योगा च्या प्रात्याक्षिकाने शहर शिवमय.
कन्हान :- छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती कन्हान व्दारे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवा निमित्य चौकाचौकात सुंदर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे देखावे, ढोल, ताश्या, पंजाबी वाद्य, डिजे, मनमोहक झाकी सह भव्य शोभायात्रा काढुन तारसा रोड चौकात अमित योगा ग्रुप नागपुर च्या छोटया मुले, मुलीने शिवकाळीन मर्दानी कला कौसल्याचे शिव गिताच्या तालावर अप्रतिम योगा प्रात्याक्षिकाने कन्हान शहर शिवमय करून शिवजयंती उत्सव थाटात साजरा करण्यात आला.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती कन्हान व्दारे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवा निमित्य शुक्रवा र (दि.१०) मार्च ला सायंकाळी ७ वाजता बीकेसीपी शाळेपासुन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करित ढोल, ताश्या, पंजाबी वाद्य, डिजे, रंगीन विधृत रोषणाईत शिवाजी महाराजांच्या विविध पैलु जिवना च्या मनमोहक झाकी सह भव्य शोभायात्रा काढुन प्राथमिक आरोग्य केंद्र चौकात शिव देखाव्याचे पुजन करून पुढे मागक्रमण करित डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात महिलानी शिवजन्माच्या गिता सह पाळणा हलवुन शिवमय वातावरणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास प्रकाश जाधव, नरेश बर्वे, विनायक वाघधरे, ताराचंद निंबाळकर, किशोर बेलसरे, किशोर पांजरे, दिलीप राईकवार, गोविंद जुनघरे आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शोभायात्रा पुढे मार्गक्रम करित महामार्गाने रायनगर पेट्रोल पंप पासुन परत तारसा रोड चौकात शोभायात्रा पोहचुन अमित योगा ग्रुप नागपुर चे संचालक संदेश खरे यांचे मार्गदर्शनात छोट्या छोटया मुले, मुलीने शिव काळीन मर्दानी कला कौसल्याचे शिव गिताच्या तालावर अप्रतिम योगा प्रात्याक्षिक सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करित शिवमय परिसर केला.
याप्रसंगी रिता बर्वे, नगरसेविका गुंफा तिडके, रेखा टोहणे, न प उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, मनिष भिवगडे, कोठीराम चकोले, चंद्रमणी भेलावे, नथुजी चरडे, कमलसिंह यादव, सुर्यभान फरकाडे, सतिश घारड, रंजित पाजुर्णे, प्रेम धरमारे, रंगराव काकडे सह प्रतिष्ठीत मान्यवर प्रामुख्या ने उपस्थित होते. प्रेरणास्त्रोत माजी खासदार प्रकाश जाधव हयानी राजमाता जिजाऊ, राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजे संभाजी महाराज, झासीची राणी लक्ष्मीबाई, तानाजी मालासुरे, बाल शिवाजी व बाल संभाजी वेशभुषा धारींचा पुष्प हाराने स्वागत करून अमित योगा ग्रुप संचालक संदेश खरे सह सर्व कलावंत चमुचे चे भगव्या दुपटयाने मान्य वरांच्या हस्ते सत्कार करून शिवजयंती सोहळया पर उपस्थिताना मार्गदर्शन करित छत्रपती शिवाजी महारा ज जयंतीच्या सर्वाना शुभेच्या देत कार्यक्रमास सहकार्य कर्ते सर्वाचे आभार व्यकत केले. कुलदिप मंगल कार्यालयात शिवभोजनाने कार्यक्रमाची सांगता करू न शिवजयंती सोहळा थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता दुर्गा कोचे, नितु तिवारी , सौफिया शेख, वैशाली खंडार, रजनी माने, दिपमाला तिवारी, वैशाली थौरात, सय्यद, सेजल रामटेके, अस्मिता कोचे, छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती कन्हान चे सचिन साळवी, बंटी हेटे, हबीब शेख, रूपेश सातपुते, पुरूषोत्तम येनेकर, जिवन ठवकर, गौरव भोयर, शिव स्वामी, प्रविण गोडे,प्रविण मांदुरकर, रोहन संतापे, उमेश भोयर, विक्की सोलंकी, संतोष गिरी, मनोज गुळधे, राजन मनधटे, उमेश पौनिकर, राहुल बावने, देवा चतुर, बलवंत खंगारे, सोनु कुरडकर, गोपी बैस, आदेश बावनकर अमोल सुटे, राजकूमार बावणे, चेतन ठवरे सह पदाधिकारी व सदस्यानी सहकार्य केले.