संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19 – मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कामठी तालुक्यात हाहाकार माजला आहे तर काही दिवसांपूर्वी पेंच धरणाचे 16 दरवाजे उघडल्याने कन्हान नदीला महापूर आला या पुराने तसेच मुसळधार पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या नागरिकांच्या नुकसानीचे पाहणी करून तसेच नदीकाठावरील गावातील नागरिकांचे नुकसानीचे पंचनामे करून या नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने नागपूर जिल्हा महासचिव प्रशांत नगरकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार अक्षय पोयाम यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष नरेश वाघमारे, कामठी शहर अध्यक्ष दीपक वासनिक,दादा कांबळे, अविनाश गजभिये,अजय मेश्राम,राजेश ढोके आदी उपस्थित होते.