लष्करीबागेत अचानक जलवाहिनी तुटल्यामुळे पाण्यासाठी धावाधाव 

– दिनेश इलमे यांनी पाण्याचे टँकर बोलावून गरिबांना केली मदत 

नागपूर :- लष्करीबाग प्रभाग क्र. 07 मधील नोगा फॅक्टरी परिसरातील मोठी जल वाहिनी तुटल्या कारणास्तव परिसरात 3 दिवस पाणी पुरवठा खंडित झालेला होता.

परीसरातील नागरीकांनी दिनेश इलमे उपाध्यक्ष भाजपा उत्तर मंडळ ह्यांना आपली समस्या सांगितली त्यांनी त्वरित नोगा फॅक्टरी आणि भीम रत्न नगर परिसरात टँकर च्या माध्यमातून लोकांना पाणी मिळवून दिले.

व सुट्टीच्या दिवशी अध्यक्षांच्या मागे लागून रात्र भर काम करवून ती जल वहिनी सुधरविण्यात आली. परिसरातील नागरीकांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून दिनेश इलमे यांनी खूप परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरकुलासाठी ना.सुधीर मुनगंटीवार सरसावले

Thu May 30 , 2024
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडथळा दूर करण्याची पत्राद्वारे मागणी – घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात अडचण येत असल्याची व्यथा चंद्रपूर :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या घरकुलाचे बांधकाम रखडल्याची व्यथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे. घरकुलाच्या लाभार्थ्यांना तातडीने रेती उपलब्ध करून देण्याकरिता केंद्रीय पर्यावरण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com