पर्यावरणपूरक धुळवड साजरी करा – मनपाचे आवाहन

नागपूर :- सर्वत्र होळीचा सण येत्या रविवार २४ आणि सोमवार २५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. सोमवार २५ मार्च रोजी साजरी होणारी धुळवड पर्यावरण पूरकरित्या साजरी करा, असे आवाहन मनपा तर्फे करण्यात आले आहे.

सोमवारी धुलीवंदन साजरे करताना पाण्याचा वापर जपून करावा तसेच रासायनिक रंगांचाही वापर करू नये. त्याऐवजी पर्यावरणपूरक हर्बल रंगांचा वापर करावा. होळी हा आनंदाचा सण आहे. रासायनिक रंगांचा वापर करून कुणाला इजा पोहोचवून या उत्सवाला गालबोट लावू नये. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपली ही कृती अत्यंत महत्वाची ठरणार असून नागपूरकर जनतेने याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन मनपा तर्फे केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध, फसव्या संकेतस्थळापासून सावध राहण्याचे महाऊर्जाचे आवाहन

Sat Mar 23 , 2024
यवतमाळ :- महाऊर्जाद्वारे महाकृषी ऊर्जा अभियान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या क्षमतेचे सौर पंप अनुदानावर दिल्या जाते. पंपाच्या लाभ मिळवितांना शेतकरी लाभार्थ्यांनी अवैध व फसवे संकेतस्थळ तसेच प्रलोभन दाखविणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जाद्वारे करण्यात आले आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ३, ५ व ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषी पंप देण्यात येत आहेत. याकरीता सौर कृषी पंपासाठी पात्र लाभार्थ्यांना सौरपंपाच्या क्षमतेनुसार खुल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights